कन्टेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात ३० जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. पुढील एक महिन्यासाठीचे निर्देश गृहमंत्रलयाने जारी केले आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. लॉकडाउन मार्च महिन्यापासून सुरु आहे. अशात लॉकडाउनचा हा पाचवा टप्पा आहे मात्र तो कंटेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रापुरता मर्यादित करण्यात आला आहे. कंटेन्मेट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे.

करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कशाला सूट देण्यात आली?
धार्मिक स्थळं उघडण्यास संमती देण्यात आली आहे, मात्र अंतर पाळणं बंधनकारक असणार आहे

शॉपिंग मॉल, हॉटेल्स रेस्तराँ सुरु होणार मात्र यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालयाकडून दिली जाईल

फेज २ मध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्याबाबतीत जुलै महिन्यात निर्णय घेतला जाईल

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम असणार आहे

आंतरराज्यीय प्रवासावर काहीही निर्बंध नसतील, यासंबंधीचे निर्णय राज्य सरकारंही घेऊ शकतील

६५ वर्षांच्या पेक्षा जास्त वय असलेले लोक आणि १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचा सल्ला

आवश्यक तेवढ्याच गोष्टींसाठी बाहेर पडण्याचे निर्देश

मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं बंधनकारक

लग्नासाठी फक्त ५० लोकांना संमती, कोणत्याही कारणाने गर्दी करण्याची संमती नाही

अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना संमती

शक्य असेल त्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारण्याचीही सूचना देण्यात आली आहे