News Flash

Toolkit case : दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांना बजावल्या नोटीसा!

काँग्रेसच्या कथित टूलकिटचा मुद्दा चर्चेत

काँग्रेसच्या कथित टूलकिटचा मुद्दा सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या कार्यालयात पोहोचत आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने राजीव गौडा आणि रोहन गुप्ता या दोन कॉंग्रेस नेत्यांना नोटीस पाठविली. या दोघांचा जबाब घेण्यासाठी नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे.

या दोघांनी १९ मे रोजी तुघलक रोड पोलीस स्टेशनमध्ये संबित पात्राच्या ट्विटविरोधात तक्रार दिली होती. राजीव गौडा यांचे म्हणणे आहे की, आमच्या तक्रारीवरून छत्तीसगडमध्येही खटला दाखल करण्यात आल्याचे आम्ही दिल्ली पोलिसांच्या नोटिसला उत्तर दिले. आम्ही तिथे या प्रकरणाचा पाठपुरावा करू. दिल्ली पोलिसांना संबित पत्राच्या ट्विटवर सेल ट्विटर मॅनिपुलेटेड टॅग देणार्‍याचा शोध आहे. सेल-अधिकारीही सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये असलेल्या ट्विटर ऑफिसमध्ये पोहोचले होते.

‘टूलकिट’प्रकरणावरून राजकारण चांगलचं पेटलं आहे. काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’बाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रसृत केलेल्या संदेशाला ट्विटरने ‘फेरफार’ प्रकारात वर्गीकृत केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी पत्र पाठवले होते. सोमवारी पोलिसांनी कारवाई केली आहे.

काँग्रेस म्हणते समाजमाध्यमांना भाजपा घाबरलं

‘‘आम्ही ट्विटरला पत्र दिले होते. ट्विटरकडे टूलकिटबाबतची कोणती माहिती आहे आणि त्यांनी त्याबाबतच्या संदेशाला फेरफार प्रकारात का टाकले, हे आम्हाला जाणून घ्यायचे होते’’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. करोनास्थिती हाताळणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे ‘टूलकिट’ कॉंग्रेसने तयार केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, त्यात तथ्य नसून, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती. दरम्यान, समाजमाध्यमांच्या ताकदीला सरकार घाबरले आहे. त्यामुळे सरकार कट-कारस्थान रचत आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

काय आहे प्रकरण

संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी काँग्रेस पक्ष एका टूलकिटद्वारे करोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. संबित पात्रा यांनी दावा केला होता काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे. या ट्विटमध्ये एक पत्रक देखील देण्यात आलं होतं. ज्यावर काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर सोशल मीडियावर कशा प्रकारचे ट्विट करायचे आहेत आणि कोणती माहिती वापरायची याबद्दल माहिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 3:06 pm

Web Title: notice issued to two congress leaders in toolkit case srk 94
Next Stories
1 भारत वेटिंगवर! फायझर, मॉडर्नाच्या लशींची बुकिंग फुल; भारताला करावी लागणार मोठी प्रतीक्षा
2 Cyclone Yaas : यास चक्रीवादळाचा धामरा बंदरावर होणार लँडफॉल! १२ तास घालणार थैमान!
3 “काँग्रेस खासदार शशी थरूर यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा”; भाजपा खासदाराची मागणी
Just Now!
X