लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचे तिकिट बुक केल्यानंतर काही कारणामुळे जाणे शक्य नसेल तर अनेकजण ते तिकिट रद्द करतात. पण तुम्ही ते तिकिट रद्द न करता कुटुंबातील अन्य व्यक्तिच्या नावे ट्रान्सफर करु शकता. खरतंर हा नियम १९९० सालीच झाला पण फार कमी जणांना त्याबद्दल माहिती आहे.

कन्फर्म रेल्वे तिकिट दुसऱ्या व्यक्तिच्या नावावर ट्रान्सफर करण्यासंबंधी १९९० सालीच मार्गदर्शक तत्वे आखून नियम बनवण्यात आला. १९९७ आणि २००२ साली या मार्गदर्शक तत्वांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. या नियमानुसार तुम्ही तुमचे कन्फर्म रेल्वे तिकिट कुटुंबातीलच वडिल, आई, भावंड, मुले आणि पत्नीच्या नावावर ट्रान्सफर करु शकता. फक्त हे तिकिट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी अर्ज करावा लागेल.

सरकारी कर्मचाऱ्याला कन्फर्म तिकिट ट्रान्सफर करुन हवे असल्यास त्याला २४ तास आधी अर्ज करावा लागेल. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीली तिकिट ट्रान्सफर करुन हवे असल्यास त्यांना संस्था प्रमुखाची मंजुरी लागेल. त्यानंतर त्याच शैक्षणिक संस्थेच्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावावर तिकिट ट्रान्सफर होईल. कन्फर्म तिकिट ट्रान्सफर करण्याच्या या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.