News Flash

LOC वर पाकिस्तानच्या गोळीबारात लहान मुलीचा मृत्यू, नऊ जखमी

जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात आज सकाळपासून पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने तुफान गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने तुफान गोळीबार केला. या गोळीबारात सहावर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. नऊ नागरीक या गोळीबारात जखमी झाले आहेत. आज सकाळपासून पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने तुफान गोळीबार सुरु आहे.

शाहपूर आणि केरनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोर्टार डागण्यात आल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. सर्तक असलेले भारतीय जवान पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. एक नागरीक या गोळीबारात जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 2:56 pm

Web Title: pakistan troops resort to firing on indian forward posts in poonch
Next Stories
1 VIDEO: मोदींच्या वर्ध्यामधील सभेला अर्ध मैदान रिकामं
2 हिंदू दहशतवाद शब्द वापरुन काँग्रेसने देशाचा अपमान केला – नरेंद्र मोदी
3 अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – नरेंद्र मोदी
Just Now!
X