पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७४ व्या स्वातंत्र्यदिनाानिमित्त लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना, आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ ची सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. तसेच, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात आणखी एक आणि अतिशय मोठे असे अभियान सुरू होत आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आता तुमची प्रत्येक तपासणी, प्रत्येक आजार, तुम्हाल कोणत्या डॉक्टरने कोणते औषध दिले, कधी दिले, तुमचे रिपोर्ट काय होते ही सर्व माहिती या एकाच हेल्थ आयडीमध्ये असेल.

आणखी वाचा- करोना लसीबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

या अभियनाांतर्गत वैयक्तिक वैद्यकीय माहिती, तपासणी केंद्र, वैद्यकीय संस्था व स्टेट मेडिकल काउंसिलला डिजिटल करण्याची योजना आहे.

आणखी वाचा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’, पंतप्रधान मोदींचा नवा नारा

या मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा खासगी मेडिकल अहवाल असणार आहे. ज्यामध्ये संबंधिताने कोणत्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करायची आहे याबाबत सर्व माहिती दिलेली असणार आहे. तसेच, वैद्यकीय संस्था आणि टेस्ट मेडिकल काउन्सिलला डिजिटल स्वरूप देण्याची या मिशन अंतर्गत योजना आहे. यामुळे देशातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही ठिकाणच्या आरोग्य चिकित्सक केंद्राची माहिती मिळणे शक्य होणार आहे.

आणखी वाचा- ‘आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले’

सर्वप्रथम हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजिटल डॉक्टर व आरोग्य सुविधी यामध्ये रजिस्टर केल्या जातील. त्यानंतर ई-फार्मसी आणि टेलीमेडिसीन सेवा देखील यामध्ये असणार आहे. यासाठी विशेष मार्गदर्शकप्रणाली बनवली जाणार आहे.

कशाप्रकारे काम करणार नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन –
– या मिशन अंतर्गत डॉक्टरांच्या माहितीसह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती एकाच अॅपवर उपलब्ध होईल.
– हे अॅप डाउनलोड करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. ज्यानंतर तुम्हाला एक हेल्थ आयडी मिळेल.
– याद्वारे होणारे उपाचार व तपासण्यांची संपूर्ण माहिती डिजिटली जतन करावी लागेल, जेणेकरून याची नोंद ठेवल्या जाईल.
– जेव्हा तुम्ही कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे उपचार घेण्यास जाल तेव्हा तुम्हाल सर्व कागदपत्रं किंवा रिपोर्ट्स घेऊन जाण्याची गरज नसेल.
– डॉक्टर कुठूनही तुमच्या युनिक आयडीद्वारे तुमचा सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल पाहू शकतील.
– यावर रजिस्ट्रेशन करणे ऐच्छिक असणार आहे.