पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधून संपूर्ण भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवणारं भाषणं केलं. मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. निराश होऊ नका. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोगच, असे मोदी म्हणाले. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले.

भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधील उपस्थित प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हात मिळवला. म्हणाले, ‘ तुमच्या सारखे ज्येष्ठ लोक इथे असल्याने याचा मोठा फायदा होतो.’ यावेळी इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दे आपलं दुखं लपवू शकले नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केलं.

विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग – मोदी

चांद्रयान २ च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता असे मोदी म्हणाले. इस्त्रोच्या सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.


यावेळी मोदी म्हणाले की, ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचे इस्रोनं जतन केलं आहे. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.