News Flash

मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला, अयोध्येत येताच पूर्ण केलं ‘हे’ वचन

नरेंद्र मोदी १९९१ मध्ये २९ वर्षांपूर्वी अयोध्येत आले होते

१९९१ मधील फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल झाले आणि २९ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला तो शब्द पूर्ण झाला. नरेंद्र मोदी १९९१ मध्ये २९ वर्षांपूर्वी अयोध्येत आले होते. यावेळी त्यांनी जेव्हा राम मंदिर उभं राहील तेव्हाच आपण पुन्हा अयोध्येत येऊ असं जाहीर केलं होतं. त्यानुसार नरेंद्र मोदी आता तब्बल २९ वर्षांनी अयोध्येत पोहोचले आहेत. योगायोगाने नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने भूमिपूजनाचा मानही त्यांनाच मिळाला आहे.

आणखी वाचा- राम जन्मभूमी आंदोलनातील ‘ते’ पाच प्रमुख चेहरे, प्रमोद महाजनांनी आडवाणींना दिला होता महत्त्वाचा सल्ला

नरेंद्र मोदी १९९१ मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. तेव्हा महेंद्र त्रिपाठी यांनी काढलेल्या फोटोत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदीदेखील कॅमेऱ्यात कैद झाले होते. नरेंद्र मोदी भाजपाचा मुख्य चेहरा म्हणून समोर आल्यानंतर हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. महेंद्र त्रिपाठी त्यावेळी विश्व हिंदू परिषदेसाठी फोटोग्राफर म्हणून काम करत होते. रामजन्मभूमीजवळच त्यांचा स्टुडिओ होता.

आणखी वाचा- आडवाणी, रथयात्रा, गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदी…. असा होता प्रवास

‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले होते. ही यात्रा कन्याकुमारीमधून सुरु झाली होती. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधितही केलं होतं. महेंद्र त्रिपाठी यांनी त्यावेळी मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार ? असं विचारलं असता ज्या दिवशी राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल तेव्हा मी पुन्हा येईन असं उत्तर दिलं होतं. त्यानुसार नरेंद्र मोदी २९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेलं ते आश्वासन पूर्ण करत असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत हजर झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:11 pm

Web Title: pm narendra modi keep 28 year old vow to return and build ram temple in ayodhya sgy 87
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 राम जन्मभूमी आंदोलनातील ‘ते’ पाच प्रमुख चेहरे, प्रमोद महाजनांनी आडवाणींना दिला होता महत्त्वाचा सल्ला
2 “आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा करावी की…”
3 भाजपानं पहिल्यांदा राम मंदिराची मागणी केली, तो पालमपूरचा प्रस्ताव काय होता?
Just Now!
X