28 February 2021

News Flash

उत्तराखंडमध्ये आता उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं

हा बदल करण्यामागचे कारण सांगताना उत्तर रेल्वेने सांगितले की, संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याने हा बदल करण्यात आला असून तो नियमानुसारच आहे.

उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या स्थानकाच्या नावांच्या फलकामधील उर्दू भाषेतील नावाचा उल्लेख आता संस्कृत भाषेत केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हा बदल करण्यामागचे कारण सांगताना उत्तर रेल्वेने सांगितले की, संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याने हा बदल करण्यात आला असून तो नियमानुसारच आहे. सन २०१० मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याची घोषणा केली होती. हे निशंक आता केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री आहेत.

रेल्वे स्थानकाचे नाव ठराविक भाषेत लिहिण्याचे नियम

उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांच्या माहितीनुसार, रेल्वेच्या नियमावलीत हे सांगण्यात आले आहे की, प्लॅटफॉर्मवरील साईन बोर्डवर रेल्वे स्थानकांची नावं हिंदी आणि इंग्रजीनंतर संबंधीत राज्याच्या दुसऱ्या अधिकृत भाषेत लिहिली जायला हवीत.

‘संस्कृत’ उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा

आता संपूर्ण उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकांवरील फलकांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि उर्दूऐवजी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत स्थानकांची नावं लिहिण्यात येतील. उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा ‘संस्कृत’ असल्याने रेल्वे स्टेशन्सवर उर्दूमध्ये लिहिलेल्या नावांना बदलून संस्कृतमध्ये करण्यात येणार आहे, दीपक कुमार यांनी ही माहिती दिली.

राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनचा नियम 

उत्तराखंड राज्याची निर्मिती ९ नोव्हेंबर २००० मध्ये झाली तरी आजपर्यंत रेल्वे स्थानकांवरील नावं उर्दूमध्येच लिहिण्यात येत होती. कारण, यातील बहुतेक स्थानकांची नावं ही उत्तराखंड उत्तर प्रदेश राज्याचा भाग होते तेव्हापासूनची आहेत. उत्तर प्रदेशची दुसरी अधिकृत भाषा उर्दू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 9:13 am

Web Title: railway stations sign board names replace urdu to sanskrit as second language of uttarakhand aau 85
Next Stories
1 केरळमध्ये मशिदीत पार पडला हिंदू विवाह, मुस्लीम समाजाने लावून दिलं लग्न; १० तोळं सोनं दिलं भेट
2 Video: अजित डोवाल यांना भारताचे 007 जेम्स बॉण्ड का म्हणतात?
3 भाजपाला आज मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; ‘हे’ नाव आघाडीवर
Just Now!
X