News Flash

संघाने आता राजकारणच करावे -दिग्विजय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता सांस्कृतिक संघटना म्हणून काम करणे सोडून पूर्णपणे राजकारण करावे, असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस

| October 28, 2013 12:56 pm

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता सांस्कृतिक संघटना म्हणून काम करणे सोडून पूर्णपणे राजकारण करावे, असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले आहे, जर हे राजकारण नसेल तर दुसरे काय आहे मला समजत नाही.विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख गेली अनेक वर्षे जी भाषणे करीत आले आहेत त्यात नेहमी राजकारण व पाकिस्तानचा उल्लेख करीत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांस्कृतिक संघटना म्हणवून घेणे आवडते पण त्यांनी संस्कृतीसाठी दुरान्वयानेही काही केलेले नाही, असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:56 pm

Web Title: rss should enter in politics digvijay singh
Next Stories
1 निवडणुका हे काँग्रेस आणि संघामधील महाभारत -चिदंबरम
2 सीमावर्ती भागात लवकरच भारतीय रेल्वेचे जाळे
3 २६/११ संबंधीचे महत्त्वाचे पुरावे पाकिस्तानला सुपूर्द
Just Now!
X