News Flash

कांदा स्वस्त करण्यासाठी सरकारचा नवा उपाय, साठेबाजांवर आणले काही निर्बंध

सध्या बाजारात कांद्याचा तुटवडा असून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत.

सध्या बाजारात कांद्याचा तुटवडा असून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे हे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नवी उपायोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि फुटकळ व्यापाऱ्यांना जास्त स्टॉक साठवून ठेवता येणार नाही.

घाऊक आणि फुटकळ व्यापाऱ्यांसाठी असलेली कांदा साठवण्याची मर्यादा ५० टक्क्यांनी घटवून अनुक्रमे २५ आणि पाच टक्के करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक विषय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता सर्व राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर फुटकळ विक्रेत्यांना पाच टनापेक्षा जास्त कांद्याचा स्टॉक ठेवता येणार नाही.

हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. कांद्याची आयात करणाऱ्यांना हा आदेश लागू होणार नाही. यापूर्वी केंद्र सरकारने ३० सप्टेंबरला घाऊक आणि फुटकळ विक्रेत्यांवर कांद्याचा स्टॉक करण्यावर मर्यादा आणल्या होत्या. देशाच्या वेगवेगळया बाजारात कांद्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. काही राज्यांमध्ये प्रतिकिलो कांद्याच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 3:56 pm

Web Title: to reduce onion rates govt new formula dmp 82
Next Stories
1 भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना मिळाली बुलेट ट्रेन प्रकल्पाची कंत्राटं
2 आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही : गडकरी
3 ठाकरे सरकारचा दणका! रद्द केलं फडणवीसांनी गुजरातमधील कंपनीला दिलेलं ३२१ कोटींच कंत्राट
Just Now!
X