देशात मागील काही दिवसांपासून करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्ये ४४ हजार ७३९ जणांनी करोनावर मात केली असून, ३८ हजार ६१७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ४७४ रुग्णांचा या कालावधीत मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८९ लाख १२ हजार ९०८ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात ४ लाख ४६ हजार ८०५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ८३ लाख ३५ हजार ११० जण करोमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. याशिवाय देशभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३० हजार ९९३ झाली आहे.

देशात १२,७४,८०,१८६ नमुन्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली आहे. यापैकी कालण(१७ नोव्हेंबर) रोजी ९ लाख ३७ हजार २७९ नमुने तपासण्यात आले. आसीएमआर कडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या रोज अधिक आढळत आहे. नक्कीच ही दिलासादायक बाब असली, तरी देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सणासुदीचा काळ असल्याने करोना संसर्गाचा धोका जास्त असल्याचेही सांगितले जात आहे.