02 December 2020

News Flash

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर

आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल  जाहीर केला आहे.

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा(Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल upsc.gov.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट काही तांत्रिक कारणास्तव काम करत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना upsc.gov.in येथे निकाल पाहण्यास अडचणी येत असतील, ते यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल upsconline.nic.in वर जाऊन पीडीएफ डाउनलोड करून देखील जाणून घेऊ शकतात.

जे विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेबाबतची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहत रहावी, असे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 8:33 am

Web Title: upsc has declared the result of the civil services prelims 2020 and indian forest services prelims 2020 exams msr 87
Next Stories
1 “बिगरभाजपा राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?”
2 फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाकिस्तान करडय़ा यादीत
3 इशरतजहाँ प्रकरण : ३ पोलिसांची याचिका फेटाळली
Just Now!
X