News Flash

आरक्षणासाठी मोदी संघाचा विरोध पत्करणार का ?- दिग्विजयसिंह

देशातील आरक्षणाबाबत संघ मांडत असलेली भूमिका काही नवीन नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेला नरेंद्र मोदी विरोध करणार का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी विचारला आहे. देशातील आरक्षणाबाबत संघ मांडत असलेली भूमिका काही नवीन नाही. परंतु, या मुद्द्यावर संघाला विरोध करणार की संघाच्या ‘फतव्या‘पुढे झुकणार, हे मोदींनी स्पष्ट करावे, असे आव्हान सिंह यांनी दिले. याशिवाय, दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमावरही टीका केली. मोदींची बनावट प्रतिमांची ‘डिजिटल फौज‘ सामाजिक-आर्थिक आघाडीवरील मोदींची अकार्यक्षमता आणि अपयश झाकून ठेवू शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोणत्याही जातीला आरक्षण देताना त्याची पात्रता ठरविण्यासाठी एक बिगर राजकीय सदस्यांची समिती नियुक्त करावी, असे मत मांडले होते. तत्पूर्वी गेल्या वर्षी बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याचे मत व्यक्त केल्याने देशभर राजकीय क्षेत्रात त्याला विरोध करण्यात आला होता. निवडणुकीत त्यांच्या या विधानाचा भाजपला चांगलाच फटका बसला होता.

बिगरराजकीय समिती नेमा! 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2016 5:26 pm

Web Title: would narendra modi pl clarify would he confront rss on reservation says digvijay singh
Next Stories
1 सुरेश प्रभूंकडून रेल्वे अर्थसंकल्पावर अखेरचा हात
2 भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा खपवून घ्यायच्या का ?- अमित शहा
3 ‘भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानेच जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कारवाई’
Just Now!
X