07 June 2020

News Flash

…तर कारवाई होणार, आयकर विभागाचा नोकरदार वर्गाला इशारा

आयकर परतावा भरताना केलेली एखादी चूक तुमच्या अंगलट येऊ शकते. आयकर विभागाने नोकरदार वर्गातील करदात्यांना इशारा दिला आहे.

आयकर परतावा भरताना केलेली एखादी चूक तुमच्या अंगलट येऊ शकते. जर तुम्ही कर वाचवण्यासाठी खोटी माहिती देण्याचा विचार करत असाल तरीही तुम्हाला महागात पडू शकतं. कारण असं काही करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, तसंच अशा लोकांवर आमची नजर असेल असा इशारा आयकर विभागाने दिला आहे.

आयकर विभागाने नोकरदार वर्गातील करदात्यांना इशारा दिला आहे. नोकरदार वर्गातील करदात्यांनी कर वाचवण्यासाठी कमी कमाई दाखवून सूट मिळवण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. आयकर विभागाच्या बंगळुरू येथील सेंट्रल प्रॉसेसिंग सेंटर (CPC) ने याबाबत मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. यामध्ये कर वाचवण्यासाठी फ्रॉड टॅक्स सल्लागारांच्या नादी लागू नका असा सल्ला विभागाकडून देण्यात आला आहे. परतावा भरताना कमाई कमी दाखवणं किंवा वाढवून दाखवणं विविध कलमांतर्गत आणि प्राप्तिकर अधिनियमाच्या खटल्यातील तरतुदींनुसार दंडनीय अपराध आहे असं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

जानेवारीमध्ये आयकर विभागाने अशाच प्रकारे फ्रॉड करणा-या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. नुकतंच या प्रकरणात सीबीआयने फौजदारी खटला दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2018 8:56 pm

Web Title: wrong info in it returns will lead to prosecution complaint to employers
Next Stories
1 पुन्हा एकदा डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना, उत्तर प्रदेशातील घटना
2 “भगवा दहशतवाद शब्द वापरून काँग्रेसनं केलं भारताला बदनाम”
3 PF चा बॅलन्स चेक करण्याचे चार सोपे उपाय
Just Now!
X