News Flash

गायींसाठी राज्यात मदत कक्ष स्थापन करण्याच्या योगी सरकारच्या सूचना

ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायींना दत्तक घेण्याबद्दल जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे रेमडेसिवीर सारख्या जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील करोना काळात गायींच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर गोशाळांमध्ये करोनाच्या नियमांच योग्यरित्या पालन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

गोशाळेत गायी आणि अन्य जनावरांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बेवारसपणे फिरणाऱ्या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. भटक्या जनावरांना वाचवण्यासाठी सरकार अधिक गोशाळा आणि आश्रमांची व्यवस्था करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा- करोनाच्या तावडीत जंगलाचा राजाही सापडला; हैद्राबादमधल्या ८ सिंहांना करोनाची लागण!

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आत्तापर्यंत ५,२६८ पेक्षा जास्त गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये राज्यात तब्बल ५,७३,४१७ गायी आहेत. मुखमंत्री बेसहारा गौ-वंश सहभागिता योजनेंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने भटक्या जनावरांची काळजी घेणार्यान प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ९०० रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैद्राबादमधल्या नेहरु प्राणीसंग्रहालयातल्या ८ सिंहांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:50 pm

Web Title: yogi government instructions to set up a help desk for cows in the state abn 97
Next Stories
1 केरळमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
2 आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून १ जूनला धडकणार
3 सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस खासदारांची उद्या बैठक; करोना स्थितीवर करणार चर्चा
Just Now!
X