scorecardresearch

Indore Temple Tragedy : बेलेश्वर मंदिरातल्या विहिरीत पडून १२ भाविकांचा मृत्यू, रामनवमीच्या दिवशीच शोककळा

रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळलं आणि १२ भाविकांचा मृत्यू झाला

12 dead after roof of well in Indore temple
१२ भाविकांचा मृत्यू

इंदूर या ठिकाणी असलेल्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळून अपघात झाला. या अपघाता सुमारे २५ ते ३० जण या विहिरीत पडले. त्यानंतर या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. ANI या वृत्तसंस्थने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. मदत आणि बचावकार्य करणाऱ्या पथकाने १२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर इतर १९ जणांवर उपचार सुरू आहेत. १२ मृतांमध्ये १० महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काय म्हटलं आहे?

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी ही माहिती दिली आहे की ज्या मंदिरात ही दुर्घटना घडली तिथे मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं होतं. मदत आणि बचावकार्य करताना १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईकांना आम्ही तातडीने मदत देण्याचंही जाहीर करतो आहोत. तसंच या घटनेत जे जखमी झाले त्यांनाही मदत केली जाणार आहे. १२ मृतदेहांमध्ये १० महिला आहेत. तर एका पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना नेमकी कशी घडली त्याची चौकशी करण्याचे आदेशही आम्ही दिले आहेत असंही मिश्रा यांनी स्पष्ट केलं.

नेमकी काय घडली घटना?

इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी अचानक विहिरीचं छत कोसळलं. २५ ते ३० भाविक या विहिरीत कोसळले आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता त्यावेळी विहिरीचं छत कोसळलं आणि त्यामध्ये २५ ते ३० भाविक पडले. मंदिरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मदत आणि बचावकार्यही तातडीने सुरू करण्यात आलं.

पुरातन विहिरीचं छत कोसळल्याने भीषण अपघात

इंदूरमधल्या स्नेहनगरमध्ये पटेलनगर हा भाग आहे. या ठिकाणी बेलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात विहिर आहे. खूप आधीपासून ही विहिर आहे. भाविक रामनवमीच्या उत्सवासाठी या ठिकाणी जमले होते. मात्र छत कोसळून अपघात झाला आहे त्यामुळे २५ ते ३० भाविक या ठिकाणी अडकले होते. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळून हा अपघात झाला आहे. जो विहिरीचा भाग होता त्यावर मंदिर होतं. विहिरीचं छत कोसळून अपघात झाला

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या