जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरू

शस्त्रसाठा हस्तगत करण्यात जवानांना यश

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. दरम्यान,आतापर्यंत तीन दहशतदवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. तर, तीन जवान जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस व लष्करी जवानांचे संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.

या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात जवानांना यश आले आहे. कुलगाममधील नागनाद-चिम्मर परिसरात चमकीस सुरूवात झाली आहे. या परिसरास जवानांनी वेढा दिला असून, शोधमोहीम राबवली जात आहे.

उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये काल घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत, जवानांनी एक दहशतवाद्याचा खात्मा केला होता. या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल हस्तगत करण्यात आली होती. तसेच, परिसरात आणखी दहशतवादी असल्याचा संशय असल्याने जवानांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 3 terrorist killed in the encounter at kulgam msr