‘स्टार वॉर’ चित्रपटात वापरले होते तसे दूरध्वनी आता प्रत्यक्षात येणार आहेत. त्यात तुम्ही दुसऱ्या बाजूने बोलत असलेल्या व्यक्तीची त्रिमिती प्रतिमा बघू शकाल, या प्रतिमा होलोग्राम स्वरूपात दिसतील पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपयोगात येण्यास आणखी पाच वर्षे लागतील.  पोलिश दळणवळण कंपनी जगातील पहिला होलोग्राम टेलिफोन कॉल  करण्याच्या प्रयत्नात आहे.
 होलोग्राम कॉल ही संकल्पना स्टार वॉर या चित्रपटात युवराज्ञी लिया ही ल्युक स्कायवॉकरसमोर होलोग्रामच्या रूपात येते. त्यात या तंत्रज्ञानाचे मूळ आहे. हे तंत्रज्ञान लिया डिस्प्ले सिस्टीम या नावाने ओळखले जाणार असून स्टारवॉर अभिनेत्रीच्या नावानेच ते ओळखले जाईल. यात होलोग्राम प्रतिमा तयार करण्याकरिता कॉलर म्हणजे फोन करणारा एका विशिष्ट कॅमेऱ्यासमोर बसेल व त्या कॅमेऱ्यात दोन भिंगे असतील ती त्या व्यक्तीची एकच प्रतिमा तयार करील. नंतर ती होलोग्रमा मशीनकडे जाईल व नंतर त्रिमिती स्वरूपात पडद्यावर दुसऱ्याला दिसू लागेल. मायक्रोफोनच्या मदतीने होलोग्राम प्रतिमो बोलेल व हालचाली करील.