काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्या अशा कर्जबुडव्या फरार व्यापाऱ्यांसह नरेंद्र मोदी यांचं नावं घेतं, राहुल गांधींनी “सर्व चोर मोदीच का असतात?” असा सवाल विचारला होता. याप्रकरणी गुजरातमधील भाजपाच्या एका आमदाराने राहुल गांधींविरोधात फिर्याद दाखल केली.

राहुल गांधींनी मोदी समुदायाचा अवमान केला असा आरोप संबंधित भाजपा आमदाराने केला. याप्रकरणी सूरतमधील एका न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा- “…तर बाळासाहेबांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं”, एकनाथ शिंदे यांचं विधान

या संपूर्ण घटनाक्रमानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. आपण कुठल्याही समुदायाचा अवमान केला नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिलं. माझं वक्तव्य ओबीसी समुदाच्या अवमानसंदर्भात नव्हतं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यातील संबंधांबाबत होतं. अदाणी यांच्या बनावट कंपनीत २० हजार कोटी रुपये कुणी गुंतवले असा सवालही राहुल गांधींनी यावेळी विचारला.

हेही वाचा-“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना खासदार म्हणून मिळणाऱ्या अनेक सोयीसुविधा बंद होणार आहेत. लोकसभा खासदारांना दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो. शिवाय परवाना शुल्क भरल्यानंतर खासदारांना फ्लॅट किंवा बंगल्याच्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था मिळते. त्याचबरोबर खासदारांना मतदारसंघ भत्ता म्हणून ७० हजार रुपये मिळतात. तसेच कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६० हजार रुपये भत्ता मिळतो. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना या सुविधा मिळणं बंद होणार आहे.