Air India Ahmedabad Plane Crash Today Live News Updates : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी नागरी वस्तीत कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील २२९ प्रवासी आणि १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. विमानातील प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन व पोर्तुगालचे ७ नागरिक होते. केवळ एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे. तसेच हे विमान मेघानीनगरमधील नागरी वस्तीत कोसळल्यामुळे काही रहिवाशांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २६५ वर गेली आहे.
दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी हे विमान कोसळलं. विमानतळाच्या सीमेजवळ असलेल्या मेघानी नगर येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वसतीगृहावर हे विमान कोसळलं. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दुर्दैवाने त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
Air India Ahmedabad-London Plane Crash Highlights
: अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचे सर्व अपडेट्स
Ahmadabad Air India Plane Crash : बोइंग ७८७ विमान बंद करणार का? अहमदाबाद येथील भीषण दुर्घटनेनंतर अमेरिकेच्या अधिकार्यांनी दिली महत्त्वाची माहिती
Air India Ahmedabad Crash: "पतीला सरप्राइज देण्यासाठी १९ जूनचं तिकीट १२ जूनला केलं आणि…", विमान दुर्घटनेत हरप्रीत कौर यांचा मृत्यू
…तर मोठा अनर्थ झाला असता! विमान उड्डाणास उशीर झाल्यामुळे वाचले अनेक डॉक्टरांचे प्राण; नेमकं काय घडलं?
Ahmedabad Plane Crash: ६० वर्षांपूर्वी पाकिस्तानी लढाऊ विमानाने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे विमान पाडले होते; तेव्हा नेमके काय घडले होते?
Air India Ahmedabad Plane Crash LIVE Updates : NIA, इतर केंद्रीय यंत्रणाचे अधिकारी अहमदाबादमधील अपघातस्थळी चौकशीसाठी दाखल
एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर शुक्रवारी एनआयए आणि इतर केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. एअरक्राफ्ट अॅक्सिडंट इनव्हेस्टिगेशन ब्युरोकडून अधिकृतपणे चौकशीची सुरुवात करण्यात आली आहे.
"विमान कोसळलं आणि मी सीटसह फेकला गेलो", मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या विश्वासकुमार यांनी काय सांगितलं?
Air India Plane Crash : 'मी लंडनला जातेय, काही दिवस फोन करू शकणार नाही', बहिणीला केलेला फोन ठरला शेवटचा; विमान दुर्घटनेत २१ वर्षीय एअर होस्टेसचा मृत्यू
Ahmedabad Plane Crash LIVE: गुजरात एटीएसला सापडला DVR, विमान अपघाताचं कारण समजणार?
Air India Plane Crash LIVE : गुजरात एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) दुर्घटनाग्रस्त विमानाच्या मलब्यामधून एक डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर शोधला आहे. एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की "हा एक डिव्हीआर आहे. आम्ही विमानाच्या मलब्यामधून शोधून काढळा आहे. एफएसएल थक आता या ठिकाणी येईल. आम्ही हा डीव्हीआर पुढील तपासणीसाठी त्यांच्याकडे सुपूर्द करू".
Air India Plane Crash : तब्बल १०,३३,०२,२२,७८८ रुपये, इतका असू शकतो इन्शुरन्स क्लेम! भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता
Ahmedabad plane crash: हवेतच बॉम्बस्फोट होऊन कोसळलेल्या, 'एअर इंडिया कनिष्क'च्या स्मृती अंगावर काटा आणणाऱ्या!
Ahmedabad Plane Crash: इंग्रजी न समजल्यामुळे २९ वर्षांपूर्वी झाला होता विमानाचा भीषण अपघात; ३४९ बळी घेणारी ती घटना नेमकी कोणती?
Ahmedabad Plane Crash : पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आला अन् पतीला मृत्यूने गाठले
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतून बचावलेल्या विश्वास कुमार रमेशशी काही प्रसारमाध्यमांनी बातचीत केली. यावेळी तो म्हणाला, मी विमानातून उडी मारली नाही. माझ्या सीटजवळ दरवाजा होता तो तुटला आणि मी सीटसह बाहेर फेकला गेलो. त्याआधीच विमानाने पेट घेतला होता. माझ्या डोळ्यांसमोर एक एअर होस्टेस व माझ्या पुढ बसलेले अंकल-आंटी जळत होते. मी ते पाहत असतानाच बाहेर फेकला गेलो.
विश्वासकुमारने आजतकला सांगितलं की विमान धावपट्टीवरून वेग धरत होतं तेव्हाच आमच्यापैकी काही लोकांना विचित्र वाटू लागलं होतं. पाच-दहा सेकंदांसाठी सगळं काही थांबल्यासारखं वाटलं. मग मोठे आवाज, मग भयानक शांतता, मग अचानक हिरवे दिवे लागले, मग पांढरे दिवे लागले, मग पायलटने उड्डाणासाठी पूर्ण ताकद लावली, विमानाने उड्डाण केलं आणि काही सेकंदांनी विमान आदळल्याचा धक्का बसला. विमान एका इमारतीत घुसलंय असं वाटत होतं.
Air India च्या १६ विमानांचा मार्ग बदलला, अनेक विमाने परतली; नेमकं कारण काय?
दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची पंतप्रधानांकडून विचारपूस, मोदींच्या उपस्थितीत विमानतळावर उच्चस्तरीय बैठक सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन विमान दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली. पाठोपाठ या भेटीनंतर मोदी यांच्या उपस्थितीत विमानतळावर उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. मोदी या दुर्घटनेचा आढावा घेत आहेत.
"३० सेकंदात विमान कोसळलं याचा अर्थ...", ठाकरे गटाने उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात विमान कोसळलं. ज्यामध्ये २४२ प्रवासी होते. केवळ ३० सेकंदात विमान कोसळलं याचा अर्थ त्यात काहीतरी गडबड असेल. तरीदेखील त्या विमानाताल लंडनसाठी उड्डाणाची परवानगी कशी मिळाली? या सगळ्याची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. मात्र, सरकार या दुर्घटनेची जबाबदारी नाकारू शकत नाही.
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी केली. पाठोपाठ त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आता ते अहमदाबाद विमानतळावर जाऊन प्रशासकीय अधिकारी व विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातपूर्वी वैमानिकाने दिला होता तीनदा 'मे डे' संदेश
Vijay Rupani : १२०६ होता विजय रुपाणींचा लकी नंबर, पण त्याच दिवशी काळाने घातला घाला!
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयात जाऊन जखमींना भेटणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादेत दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळाची पाहणी केली असून या घटनेची माहिती घेतली. आता ते रुग्णालयात जाऊन जखमींना भेटणार आहेत.
पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल
पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून ते थेट जखमींवर ज्या रुग्णालयात उपाचर चालू आहेत तिथे जाणार आहेत.
विमानातील २२९ प्रवासी व १२ क्रू सदस्यांचा मृत्यू
Air India Plane Crash: उड्डाण घेताच पुढच्या ३० सेकंदात झाला अनर्थ; विमान अपघाताचा नवा व्हिडीओ आला समोर
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचं सविस्तर विश्लेषण; नेमकं काय घडलं असेल? वाचा काय म्हणतायत हवाई उड्डाण तज्ज्ञ…
Ahmedabad Plane Crash Live Updates : पंतप्रधान मोदी अहमदाबादला रवाना, रुग्णालयात जाऊन जखमींना भेटणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीवरून अहमदाबादला रवाना झाले आहेत. ते सर्वप्रथम विमान दुर्घटनेतील जखमींना भेटणार आहेत. रुग्णालयात जाऊन ते जखमींची चौकशी करतील. तसेच, या विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशालाही भेटणार आहे. यासह ते घटनास्थळाची पाहणी करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.