‘सीआयए’ने ‘९/११’ च्या संशयितांचा छळ केला होता

अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या इमारतींवर विमाने धडकवण्याच्या, अर्थात ‘९/११’च्या घटनेनंतर पकडण्यात आलेल्या संशयितांचा ‘सीआयए’ने छळ केला होता, अशी कबुली अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.

अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या इमारतींवर विमाने धडकवण्याच्या, अर्थात ‘९/११’च्या घटनेनंतर पकडण्यात आलेल्या संशयितांचा ‘सीआयए’ने छळ केला होता, अशी कबुली अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.
‘९/११’च्या संशयितांच्या छळासाठी सीआयएने कोणकोणती तंत्रे वापरली होती, या संदर्भातील सिनेटचा अहवाल अमेरिकी प्रशासन लवकरच जाहीर करणार आहे. या पाश्र्वभूमीवर ओबामा यांनी ही कबुली दिली आहे. ‘९/११’ घडल्यानंतर लगेच आमच्याकडून काही चुका झाल्या. वास्तविक आम्ही बहुतांश गोष्टी योग्य प्रकारे केल्या. परंतु आम्ही काहीजणांचा छळ केला. आमच्या मूल्यांशी विपरीत अशा काही गोष्टी आमच्याकडून घडल्या, असे ओबामा यांनी म्हटले आहे.
हे असे का घडले हे मी समजू शकतो. ट्विन टॉवर आणि पेंटॅगॉनवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर जनता किती घाबरली होती, असे आणखी काही हल्ले होण्याची शक्यता आहे का या शंकेने ती भयग्रस्त होती. स्वाभाविकच पोलीस आणि सीआयएवरही त्यावेळी जबरदस्त दडपण आलेले होते. त्या घटनांकडे आज मागे वळून पाहताना उगीचच संवेदनशीलतेचे ढोंग करण्याची आवश्यकता नाही. त्या हल्ल्यांचा तपास करणारे अधिकारी मोठय़ा दडपणाखाली होते आणि त्यांचे काम निखळ देशहिताचे होते, असे शिफारसपत्रही ओबामा यांनी दिले आहे.
‘९/११’च्या तपासात आपण बरेच काही चांगल्या पद्धतीने पार पाडले. मात्र काही चुकाही झाल्या. येऊ घातलेल्या अहवालात त्यांचेच प्रतिबिंब उमटले आहे. म्हणूनच मी अध्यक्ष बनताच पोलीस चौकशीच्या काही अतिशयोक्त तंत्रांवर बंदी घातली, असे स्पष्टीकरणही ओबामा यांनी दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Barack obama acknowledges cia indulged in torture after 9 11 terror attacks