पटना : सत्ताधारी आघाडीतील भाजपचा रोष ओढवून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत़  जातनिहाय जनगणनेबाबत आठवडय़ाअखेपर्यंत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे नितीशकुमार यांनी सोमवारी सांगितल़े

 ‘‘जातनिहाय जनगणनेबाबत सर्व पक्षांचे मत विचारात घेण्यात येणार आह़े  ही बैठक शुक्रवारी, २७ मे रोजी आयोजित करण्याचे नियोजन आह़े  त्यास काही पक्षांनी संमती दिली असून, अन्य पक्षांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे’’, असे नितीशकुमार यांनी सांगितल़े  या बैठकीत जातनिहाय जनगणनेबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यास सर्वपक्षीयांचा पािठबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़  राज्य सरकारने तीन दिवसांत जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिला होता़ त्यानंतर नितीशकुमार यांनी तेजस्वी यांना भेटून जातनिहाय जनगणना लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले होत़े

भाजपची भूमिका काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमधील भाजप नेत्यांनी सुरूवातीला जातनिहाय जनगणनेचे समर्थन केले होत़े  मात्र, जातनिहाय जनगणनेची मागणी केंद्र सरकारने फेटाळल्याने त्यांची पंचाईत झाली़  याबाबत माध्यमांनी विचारले असता, भाजप नेते, उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्दय़ाला बगल दिली़  याबाबतच्या सर्व पैलूंवर विचार करण्यात येईल, असे ते म्हणाल़े