भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यात १९ मार्च रोजी हा प्रकार घडला असून त्याचं सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नीची कार चोरीला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

ही कार ड्रायव्हरच्या ताब्यात असताना चोरीला गेल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांच्या नावावर या कारची हिमाचल प्रदेशमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. फॉर्च्युनर कंपनीची ही कार त्यांचा चालक जोगिंदर सिंग गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेला होता. तिथून परत आल्यानंतर दिल्लीच्या गोविंदपुरी भागातील आपल्या घरी जेवणासाठी तो गेला. यावेळी कार त्याच्याकडेच होती. तिथूनच ही कार चोरीला गेल्याचं निष्पन्न झालं आहे.

Blinken calls for handling differences responsibly in talks with Xi jinping
मतभेद जबाबदारीने हाताळावेत! जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत ब्लिंकन यांचे आवाहन; चीनचा सहमतीवर भर
Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

१९ मार्च रोजी दुपरी ३ च्या सुमारास ही कार सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला नेली होती. यानंतर चालक दुपारच्या जेवणासाठी घरी गेला. मात्र, परत आल्यावर तिथे कार दिसली नसल्याची माहिती जोगिंदर सिंगनं पोलिसांना दिली आहे.

CCTV पोलिसांच्या हाती!

दरम्यान, पोलिसांनी महामार्गांवरील सीसीटीव्ही तपासले असता त्यातील एका कॅमेऱ्यात ही कार दिसल्याचं सांगितलं जात आहे. ही कार गुरगावच्या दिशेनं जाताना दिसली असून त्याअनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.