चीनमधील करोना उद्रेकानंतर केंद्र सरकारने मास्कसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. देशामध्ये १६३ नवे करोना रुग्ण आढळून आले असून केंद्र सरकारने मास्कसक्तीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या तरी केंद्राकडून मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात कोणताही निर्णय किंवा निर्देश जारी करण्यात येणार नाही,” असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र सरकारने जारी केलेल्या सूचनांमध्ये लोकांनी स्वत: मास्क घालण्यासंदर्भात आग्रही रहावं आणि करोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं असं म्हटलं आहे. सध्या तरी सरकारकडून मास्कसक्तीचा नियम लागू केला जाणार नाही असं या नव्या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील २४ तासांमध्ये भारतात करोनाचे १६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशामध्ये तीन हजार ३८० सक्रीय करोना रुग्ण आहेत. तर देशातील करोना रुग्णांची संख्या ४ कोटी ४६ लाख इतकी आहे. मागील आठ महिन्यांपासून देशातील करोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या करोना चाचण्यांची संख्या कमी झाली असल्याने पॉझिटीव्हीटी रेट हा ०.१४ टक्के इतका असल्याचं वृत्त आरोग्यमंत्रालयाच्या सुत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने दिली आहे.

आणखी वाचा – करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

चार केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने सध्या करोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय आणि सूचना जारी केल्या आहेत. २२० कोटी बुस्टर डोस देण्यात आले आहेत. एकूण लसीकरणापैकी ही आकडेवारी २७ टक्के इतकी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus people advised to wear masks by govt it is not mandatory for now scsg
First published on: 23-12-2022 at 18:09 IST