scorecardresearch

“चित्रपट करमुक्त करून मोदी सरकार आमच्या…”; The Kashmir filesवर फारुख अब्दुल्लांची टीका

फारुख अब्दुल्ला यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Kashmiri Pandit Exodus: …तर मला फाशी द्या – फारुख अब्दुल्ला

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करून, भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार लोकांच्या मनात आमच्याविरोधात द्वेष निर्माण करू इच्छित आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. “त्यांना लोकांच्या मनात आमच्या विरोधात आणखी द्वेष निर्माण करायचा आहे. ते म्हणत आहेत की प्रत्येक पोलीस आणि सैनिकाने हा चित्रपट पाहावा जेणेकरून ते आमचा तिरस्कार करतील. जसा जर्मनीमध्ये हिटलर आणि गोबल्स यांनी लोकांच्या मनात द्वेष तयार केला होता. तेव्हा तिथे सहा लाख ज्यूंना किंमत त्याची मोजावी लागली होती. भारतात किती लोकांना या द्वेषाची किंमत मोजावी लागेल, मला माहित नाही,” असं फारुख अब्दुल्ला इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा भाजपा समर्थित…;” The Kashmir Files वरून संतापलेल्या ओमर अब्दुल्लांचा आरोप

“हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे. या चित्रपटाने राज्यातील प्रत्येक जीवाला, हिंदू आणि मुस्लिमांना प्रभावित केले आहे. ती घटना आठवून माझं मन सुन्न होतं,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farooq abdullah reaction on the kashmir files movie hrc

ताज्या बातम्या