आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यासह दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीगंज पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमेठीमध्ये कुमार विश्वास यांनी केलेल्या प्रचाराचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी नविनकुमार सिंग यांनी सांगितले. केजरीवाल आणि कुमार विश्वास यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून पूर्वपरवानगी न घेता रस्त्यावर सभा घेतली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याआधी गेल्या शुक्रवारी कुमार विश्वास यांच्यासह १०० जणांवर गौरीगंज पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कुमार विश्वास यांनी गौरीगंज पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले होते.
केजरीवाल आणि कुमार विश्वास यांच्याविरुद्ध गुन्हा
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यासह दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 21-04-2014 at 05:41 IST
TOPICSअरविंद केजरीवालArvind Kejriwalकुमार विश्वासलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against kejriwal vishwas for violating model code