महेश सरलष्कर, लोकसत्ता

अयोध्या : अयोध्येतील नवे भव्य राम मंदिर हा स्थापत्यशास्त्राचा अद्भुत अविष्कार असेल. कृत्रिम दगडाच्या भक्कम विस्तृत पायावर उभारले जाणारे हे मंदिर एक हजार वर्षे टिकेलच, पण अडीच हजार वर्षांनंतरही मंदिर उभे दिसेल, असा विश्वास निर्माण प्रक्रियेमध्ये सक्रिय असलेले श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे (न्यास) अभियंता गिरीश सहस्रभोजनी यांनी व्यक्त केला.

राम मंदिराच्या उभारणीत प्रामुख्याने सक्रीय असलेल्या न्यासाच्या आठ अभियंत्यांपैकी पाच मराठी आहेत. मंदिराचा पाया ६० फूट खोल, ६०० फूट लांब (पूर्व-पश्चिम) व ५५० फूट रुंद (उत्तर – दक्षिण) आहे.

मंदिराच्या ढाचा उभारणीच्या जागी वाळू असल्याने ती पूर्णपणे बाजूला करून काँक्रिटचा कमीत कमी वापर करून एक फुटाचे विशिष्ट स्तर तयार करण्यात आले आहेत. असे ४८ स्तर एकावर एक टाकून पाया तयार केल्याचे प्रकल्प मुख्य व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी सांगितले. विशेष

म्हणजे मंदिराच्या निर्माणात लोखंडाचा तसेच जमिनीच्या वर काँक्रिटचा वापर करण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>> प्राणप्रतिष्ठेपूर्वीच रामदर्शनाचे वेध; अयोध्येमध्ये दररोज ८० हजार भाविक, २२ तारखेच्या सोहळयाची तयारी अंतिम टप्प्यात

अहोरात्र निर्माणकार्य सुरू

मंदिरस्थळावर अहोरात्र काम सुरू असून सुमारे चार हजार कामगार, ६५ अभियंते, १२ व्यवस्थापक त्यासाठी झटत आहेत. सुमारे १,१५० कोटी रुपये खर्चाच्या राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील, तर अन्य कामे पूर्ण होण्यास सात ते आठ वर्षे लागण्याची शक्यता आहे. सध्या पूर्वेकडील प्रवेशद्वार तसेच तळमजला बांधून पूर्ण झाला आहे.

मंदिराची रचना अशी

* लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट व उंची १६१ फूट

* १८ फूट उंचीचा ध्वजदंड

* तीन मजली मंदिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, त्यात ३९२ खांब व ४४ द्वारे ’खांब व भिंतीवर देवदेवतांच्या मूर्ती