जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या करोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे गुगलने १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने गुरुवारी सांगितले की, करोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे जागतिक स्तरावर धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल.

गुगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते की नवीन वर्षात १० जानेवारीपासून आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करणार आहोत. त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल. गुरुवारी गुगलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ऑफिस टू रिटर्न प्लॅन लागू केला जाणार नाही. पुढील परिस्थिती पाहूनच कार्यालयात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतला जाईल.

गेल्या आठवड्यात सुमारे ४० टक्के अमेरिकेतील कर्मचारी करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कार्यालयात परतले आहेत. पण आता ओमायक्रॉनमुळे घरातून काम करण्यासारख्या गोष्टी पुन्हा सुरु कराव्या लागल्या आहेत. करोना महामारीच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगणारी गुगल ही पहिली कंपनी होती. गुगलची जवळपास ६० देशांमध्ये ८५ कार्यालये आहेत.

गुगलचे मुख्यालय कॅलिफोर्निया मधील माउंटन व्ह्यू नावाच्या शहरात आहे, जे खूप प्रेक्षणीय ठिकाण आहे. २६ एकर परिसरात बांधलेल्या या कार्यालयाचे नाव गुगल प्लेक्स आहे. गुगल आणि कॉम्प्लेक्स हे शब्द एकत्र करून हे नाव ठरवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना संकटाच्या सुरुवातीपासून अनेक कर्मचारी जवळपास दीड वर्षांपासून घरून काम करत आहेत. जगभरात करोनापासून काहीसा दिलासा मिळत असताना अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली होती. यासाठी कंपन्या अनेक प्रयत्न केले होते. गुगलने २०२२ च्या सुरूवातीस आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात आमंत्रित करण्यासाठी त्यांचे कार्यालय बायोफिलिक बनवण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये बनवल्या जाणार्‍या या ऑफिससाठी २.१ अब्ज डॉलर खर्च केल्याची माहिती समोर आली होती.