नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीश कुमार हे सातत्याने आपली भूमिका बदल असल्याने सध्या समाजमाध्यमांवर त्यांच्यावर ‘मीम्स’ बनवले जात असून ते जोरदार व्हायरल होत आहेत. काहींनी त्यांना ‘पलटू चाचा’ असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमधील राजकीय घडामोडीनंतर समाज माध्यमांवर अनेकांनी मजेदार मीम्स टाकत आपल्या कौशल्य बुद्धीला वाव दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत नवे सरकार स्थापन केल्यानंतर चपराक लगावण्यासाठी अनेक शब्दप्रयोग, चपखल एक ओळ आणि व्यंगचित्रांचा वापर केला गेला आहे. यातून त्यांनी आपल्या कौशल्याला वाव दिला आहे.

हेही वाचा >>> झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ईडी; हेमंत सोरेन फरार झाल्याचा भाजपचा आरोप

‘पलटू चाचा’, ‘पलटू पूत्र’ आणि ‘पलटू राम’… असे समाजमाध्यमांवर म्हटले गेले आहे. ‘उसने मुझे धोका दिया’ असा संदेशही व्हायरल होत आहे. तर एका युजरने म्हटले आहे, ‘नितीश कुमार सारखे काम करा, तुमच्या नोकरीवर प्रेम करा, तुमच्या कंपनीवर नाही’. ‘नेहमी लवचिक राहा आणि योग्य वेळी नोकरी बदला आणि हो, हातात दुसरी ऑफर असल्याशिवाय कधीही नोकरी सोडू नका’, असेही एकाने म्हटले आहे.

बिहारमधील बदलत्या राजकीय घडामोडीला क्रिकेट स्पर्धेचा टच देण्याचा एकाने प्रयत्न केला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) महसूल वाढवण्यासाठी आणि खेळाचे आकर्षण वाढवण्यासाठी एक नवीन क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप सुरू करण्याचा विचार करावा. सामन्याच्या अर्ध्या टप्प्यात कर्णधाराला बाजू बदलण्याची परवानगी देणयात यावी. त्याला ‘नितीश चषक’ म्हणावे. अन्य एका युजरने राजकारणाचे वर्णन करण्यासाठी “अंदाज अपना अपना” चित्रपटातील एका दृश्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. क्लिपवर नाव टाकून, त्यात परेश रावल (नितीश कुमार), सलमान खान (आरजेडी) आणि आमिर खान (काँग्रेस) एकाच बाईकवर बसण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. शेवटी, ‘नितीश कुमार’ बाकीच्या दोघांना, त्यांच्या पूर्वीच्या आघाडीच्या भागीदारांना मागे टाकून बाईकसह निघून जातात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilarious memes on social media after nitish kumar u turn zws
First published on: 30-01-2024 at 04:15 IST