अमेरिकेच्या सिनसिनाटी राज्यात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आठवड्याभरात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. मागच्या आठवड्यात २५ वर्षीय विवेक सैनीची एका बेघर व्यक्तीने हातोडीने वार करून हत्या केली होती. सैनीने नुकतेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. जूलियन फॉकनर नावाच्या बेघर आणि नशेखोर व्यक्तीने सैनीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे सैनीने या बेघर व्यक्तीला आश्रय देऊन, खाऊ-पिऊ घातले होते.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या; बेघर व्यक्तीला आश्रय दिला, त्यानेच हातोडीने फोडलं डोकं, केले ५० वार!

drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला

नील आचार्य नावाचा आणखी एक भारतीय विद्यार्थी मागच्या आठवड्यात मृत्यूमुखी पडला. इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठात नील शिक्षण घेत होता. पर्ड्यू विद्यापीठातील जॉन मार्टिसन होनर्स महाविद्यालयातून त्याने कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये पदवी घेतली होती. रविवारी तो बेपत्ता झाल्याचे समोर आले आणि त्यानंतर सोमवारी त्याचा मृतदेह आढळून आला.

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात २६ वर्षीय आदित्य अदलखाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊन अमेरिकेच्या सिनसिनाटी वि्दयापीठात शिक्षण घेत असलेल्या आदित्यचा ओहियो राज्यात खून झाला होता. गाडीत बसलेला असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी आदित्य अमेरिकेत गेला होता.

आणखी एका प्रकरणात इलिनॉय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय अकुल धवन विद्यार्थ्याचा जानेवारी महिन्यात मृत्यू झाला होता. धवन त्याच्या खोलीतून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घराबाहेर उणे १७ अंश सेल्सियस इतके भयानक तापमान असताना अकुल बेपत्ता झाला होता. इलिनॉय विद्यापीठाच्या संकुलातच त्याचा मृतदेह आढळून आला होता.