मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, करोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. बुधवारी (२८ डिसेंबर) याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> विश्लेषण: करोनाचा पुन्हा प्रसार होणार? सामना करण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ आणि ‘हायब्रिड इम्युनिटी’ ठरणार उपयोगी; यातला नेमका फरक काय?

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

या निर्णयानुसार शाळा तसेच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक नियम पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पब्स, विमातळ, उपहारगृहे या ठिकाणीदेखील मास्क वापरणे तसेच इतर प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. कलबुर्गी विमानतळ प्रशासनाने याआधीच मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे आदेश दिलेला आहे.

हेही वाचा >>> ‘मास्क रिटर्न’ ! मुखपट्टी बंधनकारक, कुणासाठी जाणून घ्या…

संभाव्य करोना लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी असावी यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटक सरकारने एक बैठक घेतली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री के सुधाकर होते. सोबतच या बैठकीला महसूलमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आर अशोका हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मास्क वारणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाबाबत महसूलमंत्री आर अशोका यांनी अधिक माहिती दिली आहे. “चीनमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आपल्या सल्लागार कक्षाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचा सल्ला दिलेला आहे. खबरदारी म्हणून करोनाची लक्षणं असलेल्यांवर उपचार करण्यासाठी बंगळुरू येथे दोन समर्पित रुग्णालये असतील,” असे अशोका यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भारतीय कंपनीचं कफ सिरप प्यायल्यामुळे उझबेकिस्तानमध्ये १८ मुलांचा मृत्यू? स्थानिक प्रशासनाचा दावा

दरम्यान, कर्नाटकमधील नव्या आदेशानुसार सिनेमागृहांत एन ९५ मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. तसेच घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कर्नाटक सरकारने सांगितले आहे.