मोदी आणि राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे कोल्लममध्ये मदतकार्यात अडथळा, पोलीस यंत्रणा हतबल

पंतप्रधानांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे भाग असते.

Kerala DGP , Kollam , PM Modi , Rahul Gandhi , loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
PM Modi & Rahul Gandhi: ही घटना घडल्यानंतर मोदींनी अवघ्या १२ तासांत घटनास्थळाला भेट दिली. मी त्यांच्या या भेटीबद्दल आक्षेप नोंदवला होता.

कोल्लमनजीकच्या पुट्टिंगल मंदिरातील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगेचच घटनास्थळाला दिलेल्या भेटीमुळे मदतकार्यादरम्यान पोलीस यंत्रणेवरील ताण वाढल्याचे सांगत केरळचे पोलीस महासंचालक टी.पी. सेनकुमार यांनी नाराजी व्यक्त केली. १० एप्रिलला झालेल्या या दुर्घटनेत ११४ जण मृत्युमुखी पडले. ही घटना घडल्यानंतर मोदींनी अवघ्या १२ तासांत घटनास्थळाला भेट दिली. मी त्यांच्या या भेटीबद्दल आक्षेप नोंदवला होता. पंतप्रधानांनी याठिकाणी दुसऱ्या दिवशी भेट द्यावी, असा पर्यायही मी सुचवला होता. मात्र, पंतप्रधानांना त्याचदिवशी भेट द्यायची होती. संपूर्ण पोलीस यंत्रणा पहाटेपासून याठिकाणी मदतकार्यात गुंतली होती. त्यावेळी खूप काम बाकी होते, त्यामध्ये घटनास्थळी साधी पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याने सर्वचजण खूप दमले होते. अशावेळी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भेटीमुळे पोलीस यंत्रणेला त्यांच्या सुरक्षेच्या कामात जुंपावे लागले, असे सांगत सेनकुमार यांनी नाराजी व्यक्त केली. मी त्यावेळी घटनास्थळावरच उपस्थित होतो. त्याठिकाणी कामाचा प्रचंड ढिगारा पाहता मी या भेटी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र, पंतप्रधानांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे भाग असते, अशी हतबलताही त्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kerala dgp says he had objected to visits of pm modi rahul gandhi during rescue relief work in kollam

ताज्या बातम्या