scorecardresearch

“माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे” खरेखुरे रँचो सोनम वांगचुक यांनी केला आरोप

सोनम वांगचुक यांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आंदोलन उभं केलं आहे, तसंच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sonam Wangchuk
सोनम वांगचुक हे आंदोलन करत आहेत

लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी हा आरोप केला आहे की केंद्र शासित क्षेत्रात माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लडाखमधल्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. याच्या निषेधार्थ पाच दिवसांचं उपोषण सोनम वांगचुक करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. एवढंच नाही तर सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ३० जानेवारीला उपोषणाचं आवाहन केलं आहे. माझ्या आंदोलनाला साथ द्यायची असेल तर एवढं नक्की करा असंही आवाहन सोनम वांगचुक यांनी केला आहे.

सोनम वांगचुक यांनी काय म्हटलं आहे?

लडाखमधल्या डोंगरांसाठी, लोकांसाठी, पर्यावरणासाठी मी आंदोलन उभं केलं आहे. मी आंदोलन सुरू केल्यानंतर सगळ्या देशभरातून मला फोन आले. मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि माझ्यासाठी काही करायचं असेल तर ३० जानेवारीला एक दिवसाचं उपोषण करू शकता. असं एक आवाहन सोनम वांगचुक यांनी केलं आहे. यासंदर्भातला व्हिडिओही सोनम वांगचुक यांनी पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या ट्विट आणि व्हिडिओला उत्तम प्रतिसादही मिळतो आहे.

सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे की मी नजरकैदेत आहे

मी माझ्याच घरात नजरकैदेत आहे. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? असाही प्रश्न सोनम वांगचुक यांनी विचारला आहे. मी खारदुंग दर्ऱा या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार होतो. तिथे तापमान उणे ४० डिग्री पर्यंत घसरतं. मात्र मला प्रशासनाने त्या ठिकाणी पोहचू दिलं नाही. मी आता याच जागेवरून उपोषण सुरू ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत सोनम वांगचुक यांनी हे म्हटलं आहे की लडाख केंद्र शासित प्रदेश प्रशासनाला हे वाटतं की आहे मी अमान्य असलेल्या करारावर सही करू. आता तुम्हीच मला सल्ला द्या मी काय करू? मी शांतच बसलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे का? मला अटक केली तरीही हरकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

सोनम वांगचुक यांना मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे

सोनम वांगचुक यांना २०१८ मध्ये मॅगसेसे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. सोनम वांगचुक यांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रभावित होऊन २००९ मध्ये थ्री ईडियट्स हा सिनेमा आला होता. रँचो अर्थात फुंगसुक वांगडूचा रोल आमीर खानने ही भूमिका साकारली होती. लडाखमध्ये अस्थिर उद्योग, पर्यटन आणि वाणिज्य क्षेत्रात अडचणी येत आहेत. पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी मी आंदोलन उभं केलं आहे पण माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असंही सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 09:10 IST
ताज्या बातम्या