प्रथिनाधारित लशीची साठवणूक शीतगृहाविना

उंदरांवरील प्रयोगात यश आले असून त्यांच्यात मोठय़ा प्रमाणावर प्रतिपिंड तयार झाले आहेत.

बोस्टन : ‘बोस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटल’  या अमेरिकेतील संस्थेने म्हटले आहे,की सध्याच्या लशींना साठवणुकीसाठी शीतकरणाची गरज असते. त्यात आधुनिक उत्पादन सुविधा गरजेच्या असतात, तरच त्यांचे वितरण कमी विकसित देशात करता येऊ शकते. पीएनएएस जर्नलमध्ये नवीन लशीच्या रचनेबाबत म्हटले आहे,की या लशीत शीतकरणाची गरज लागत नसल्याने लसीकरणातील तफावत दूर करण्याची संधी आहे. इतर रोगांविरोधातील लशींबाबतही या तंत्राचा वापर करता येणार आहे. या नवीन लशीमुळे करोना विषाणूविरोधात मोठय़ा प्रमाणात प्रतिकारशक्ती तयार झाली असून उंदरांवर हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. ही लस शीतकरण व्यवस्थेत असते, पण नंतर सामान्य तापमानातही ती काम करू शकते. कक्ष तापमानाला ती सात दिवस व्यवस्थित राहू शकते. नवीन लस ही प्रथिनांवर आधारित असून ती अनेक ठिकाणी तयार करता येऊ शकते.

त्यात अल्पाकास या नॅनो घटकांचा समावेश असून विषाणूचा जो  भाग पेशीत घुसण्यासाठी स्पर्श करतो त्यातील घटकांचा समावेश आहे. संशोधक नोव्हालिया पिशेशा यांनी म्हटले आहे,की काटेरी प्रथिनाचा तसेच विषाणूच्या इतर भागांचा समावेश करता येतो. त्यातून वेगवेगळय़ा विषाणू प्रकारांवर ही लस प्रभावी ठरू शकते. यात उंदरांवरील प्रयोगात यश आले असून त्यांच्यात मोठय़ा प्रमाणावर प्रतिपिंड तयार झाले आहेत. टी पेशींना त्यामुळे उद्दीपन मिळून त्या या विषाणू विरोधात लढण्यास सज्ज होतात. ही लस आरएनए वर आधारित असलेल्या फायझरम् बायोटेक व मॉडर्ना लशींसारखी नसून त्यात प्रथिनांचा वापर केल्याने ती मोठय़ा प्रमाणावर तयार करता येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New protein based covid vaccine doesnt need cold storage zws

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या