उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची प्रकृती काल (रविवार) बिघडली. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये हलवण्यात आले आहे. या ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईन लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत अखिलेश यादव यांच्याकडे विचारपूस केल्याचेही समोर आले आहे. तसेच, पंतप्रधांन मोदींनी अखिलेश यांना जी काही मदत आवश्यक असेल ती सर्व करू, असेही सांगितले आहे.

याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मी त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांना फोन करून विचारपूस केली. ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की ते लवकरात लवकरक बरे व्हावेत.” असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट द्वार सांगितले आहे.

याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनीही अखिलेश यादव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचेही समोर आले आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

अखिलेश यादव व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य मेदांता रुग्णालयात उपस्थित आहेत. सपा नेते राकेश यादव यांनी सांगितले की, आज मुलायमसिंह यादव यांची ऑक्सिजन पातळी काहीशी घसरली होती, परंतु काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत. त्यांच्या नेहमीच्या तपासण्या दररोज सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलायमसिंह यादव यांच्यावर डॉ. सुशीला काटरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. याशिवाय, मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहान हे स्वत: त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.