स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवलं आहे. अभिमुक्तेश्वरानंद यांच्या विद्यामठाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

स्वामी अभिमुक्तेश्वरानंद म्हणाले, “मी प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे की आम्हाला ज्ञानवापी मशिदीत पूजा करू दिली जावी. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मागे ठेवलं आहे. केवळ मला एकट्याला १०० कोटी सनातन धर्मियांच्या वतीने प्रकट झालेल्या देवाची पूजा करू द्यावी.”

हेही वाचा : व्यापारातही धर्म? भगव्या स्टिकरवाल्या दुकानांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनानंतर आव्हाड म्हणाले, “मग यापुढे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रशासनाने १०० कोटी सनातन धर्मियांची भावना समजून घ्यावी. देवाचा पूजा करून घेण्याचा अधिकार रद्द करू नये,” असं मत अभिमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केलं.