Raja Raghuvanshi Murder : गेल्या काही दिवसांपासून देशात राजा आणि सोनम रघुवंशी या जोडप्याची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. लग्नानंतर मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेल्या या जोडप्यातील राजा याची हत्या करण्यात आल्याची बाबा समोर आली आहे. तर या प्रकरणात त्याची पत्नी सोनम हिच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. यादरम्यान बुधवारी राजा रघुवंशी याची हत्या झाल्यानंतर एक आठवड्याने त्याचे आणि त्याची पत्नी आणि सध्या आरोपी असलेली सोनम रघुवंशी हिचे कुटुंबिय इंदोरमध्ये एकमेकांसमोर आले.
सोनमचा भाऊ गोविंद हा राजा याच्या घरी पोहचला आणि यावेळी राजा याची आई उमा यांच्या गळ्यात पडला, यावेळी त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गोविंद याने राजा रघुवंशी याच्या आईची माफी मागितली, “मम्मी, मैं खुद जाऊंगा पेशी करवाने, उसको सजा दिलवाऊंगा (आई, मी सुनावणीसाठी उपस्थित राहून सोनमला शिक्षा होईल याची काळजी घेईन).”
गोविंदने शिलाँग येथे पडत्या पावसात आठवडाभर फिरून सोनमचा मृतदेहाचा शोध घेतला होता. पण जेव्हा ती जिवंत आढळून आली तेव्हा तो तिच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशातील गाझिपूर येथे गेला. पण तिथे गेल्यावर सोनमला हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचे त्याला सांगण्यात आले.
त्यांच्या मुलाची हत्या केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने उमा यांच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रडताना उमा म्हणाल्या की, “मला कधीच कल्पना केली नव्हती खी ती असं काहीतरी करेल.”
राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या भेटीबद्दल अधिकची माहिती दिली. “गोविंद हा आमच्याबरोबर काल बोलला होता आणि त्याने तो आज येईल असे सांगितले होते. त्याने माझ्या आईची माफी मागितली. तो म्हणाला की सोनमने काही चुकीचे केले असेल तर तिला सोडले जाऊ नये.”
यादरम्यान बुधवारी सोनम आणि इथर आरोपींना मेघालय येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले, जेथे पोलिसांनी हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तिला कोठडी देण्याची मागणी केली.
मध्य प्रदेश पोलिसांनी तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा तपशील द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितला, ज्यामध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुशवाह यांने ही हत्या करण्यासाठी ५० हजार रुपये मारेकऱ्यांना दिल्याचे समोर आले आहे.
“राजने मारेकऱ्यांना त्यांची योजना पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपये दिले . हे पैसे प्रवास, हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च याच्यासाठी होते. घटनेनंतर त्यांनी वेगवेगळ्या रेल्वो पकडल्या आणि इंदोरमध्ये दाखल झाले. घटनेनंतर त्यांनी त्यांचे मोबाईल फोन नष्ट केले, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती दिली.
हत्या झाली तेव्हा सोनम तेथे उपस्थित होती असे सांगितले जात आहे. आरोपींपैकी एक विशाल याने राजाय याच्यावर मागून हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर दोन वार केले. त्यानंतर तीन आरोपींनी मृतदेह दरीत फेकून दिला.
हत्या केल्यानंतर सोनम सिलिगुडीमार्गे इंदोरला पळून गेली आणि दोन दिवस एका फ्लॅटमध्ये राहिली. त्यानंतर ती उत्तर प्रदेशला गेली गाजीपूर येथे पोहोचली. पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सयीम यांनी सोनमचा दावा पूर्णपणे स्वीकारण्याबाबत साशंकता दाखलवली आहे. “ती पोलिसांना हेच सांगत आहे. आम्ही अद्याप याची पुष्टी करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
राजा आणि सोनम हे गेल्या महिन्यात त्यांच्या हनिमूनदरम्यान मेघालयमध्ये बेपत्ता झाल्याचे सांगणअयात आले होते. पण या महिन्यात राजा याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सोनमचा सर्वत्र शोध घेतला जात होता. रविवारी रात्री पोलिसांनी राज कुशवाह याला सोनमच्या मदतीने राजा याची हत्या घडवून आणल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याला पकडल्यानंतर सोनम उत्तर प्रदेश पोलिसांसमोर शरण आली.