‘तुझेही उन्नाव पीडितेप्रमाणे हाल करू’; बसपा खासदाराची युवतीला धमकी

व्हिडीओद्वारे युवतीची न्याय देण्याची मागणी

अतुल राय

तुझेही उन्नाव पीडितेप्रमाणे हाल करू, अशी धमकी बहुजन समाज पार्टीचे खासदार अतुल राय यांनी एका युवतीला दिली आहे. सदर महिलेने अतुल राय यांच्यावर बलात्काराचा खटला दाखल केला आहे. तसंच तुझेही उन्नाव पीडितेप्रमाणेच हाल करू अशी धमकी अतुल राय आपल्याला देत असल्याचा आरोप सदर महिलेने एका व्हिडीओद्वारे केला आहे. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सदर युवतीने खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी राय हे सध्या तुरूंगात आहेत. तसंच तुरूंगात असल्यामुळे त्यांनी अद्यापही खासदारकीची शपथ घेतलेली नाही. दरम्यान, बलात्काराच्या कथित पीडितेचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युवतीने अतुल राय हे आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. तसंच तिने पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आपल्या वकीलांविरोधात खोटा खटला दाखला करण्यात आला आहे. तसंच तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आपलेही उन्नाव प्रकरणातील पीडितीप्रमाणे हाल केले जातील, अशी धमकी दिली असल्याचा आरोपही तिने केला आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक संजय यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची माहिती घेण्यात येत असून या प्रकरणाची चौकशीही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसंच पीडित युवतीच्या संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांची असून संबंधित पोलीस ठाण्यांना तिच्या सुरक्षेसाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहे. तिच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rape victim threaten by bsp mp atul rai from jail face situation like unnao rape case victim jud

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या