देशाच्या विविध भागांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले किमान १० जण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अथवा त्यांच्या संलग्न असलेल्या संघटनांशी संबंधित असल्याचे केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी म्हटले आहे.समझोता एक्स्प्रेस, मक्का मशीद आणि अजमेर शरीफ येथे झालेल्या स्फोटांची चौकशी करताना त्याच्याशी संबंधित १० जण हे रा. स्व. संघ अथवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटनांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.