Sadhvi Pragya भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ( Sadhvi Pragya ) यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळमधून भाजपाच्या खासदार म्हणून त्या कार्यरत होत्या. मात्र २०२४ मध्ये त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. मात्र आता साध्वी प्रज्ञा चर्चेत आहेत त्या त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. त्यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची एक्स पोस्ट काय?

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ( Sadhvi Pragya ) यांनी त्यांच्या सूज आलेल्या चेहऱ्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यापुढे त्या म्हणतात काँग्रेसचं टॉर्चर हे फक्त एटीएसच्या कोठडीपुरतं मर्यादित नाही. माझ्यासाठी या आयुष्यभराच्या मरण यातना आहेत. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणं, कमी ऐकू येणं, बोलण्यात एकसारखेपणा नसणं या सगळ्या गोष्टी मी सहन करते आहे. स्टेरॉईड आणि न्यूरो संबंधीच्या औषधांनी माझं सगळं शरीर सुजलं आहे. एका हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत. मी जर जगले वाचले ना तर न्यायालयात नक्की जाईन. अशी पोस्ट प्रज्ञा ठाकूर यांनी लिहिली आहे. तसंच त्यांनी त्यांचा फोटो पोस्ट केला आहे.

हे पण वाचा- Malegaon Blast: “हिंदुत्ववादी संघटनांची नावं घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता”, आरोपी प्रसाद पुरोहितचा जबाब

साध्वी प्रज्ञा यांना अटक करण्यात आली होती पण प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर

२००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ( Sadhvi Pragya ) यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मालेगाव स्फोट प्रकरणात सध्याच्या घडीला अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरु आहे. न्यायालयात प्रज्ञा सिंह ठाकूर ( Sadhvi Pragya ) यांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट लागू केला आहे. हा जामीन १३ नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येऊ शकतो. त्यासाठी प्रज्ञा ठाकूर ( Sadhvi Pragya ) यांना न्यायालयात हजर रहावं लागेल आणि हा जामीन रद्द करुन घ्यावा लागेल. प्रज्ञा सिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहेत आणि मुख्यतः प्रकृतीच्या कारणावरून त्यांना जामीन मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी

२००८ मध्ये मालेगावात जो बॉम्बस्फोट झाला त्या स्फोटातील आरोपींपैकी एक साध्वी प्रज्ञा ( Sadhvi Pragya ) आहेत. प्रकृती चांगली नसल्याने साध्वी प्रज्ञा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञा यांना २०१९ मध्ये भाजपाने तिकिट दिलं तेव्हा त्यांच्यावर आणि भाजपावर बरीच टीका झाली होती. तसंच काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी एक वक्तव्य केलं होतं. हिंदू व्यावसायिक, दुकानदार यांनी त्यांच्या आस्थापनांवर, पाटीवर आपलं नाव ठळक अक्षरांत लिहिलं पाहिजे म्हणजे हिंदू कोण आणि गैर हिंदू कोण हे समजू शकेल. यावरुनही वाद झाला होता. आता चेहरा सुजल्याची पोस्ट त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेसचं हे टॉर्चर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.