श्रीलंका अध्यक्ष सिरीसेना यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल

श्रीलंकेतील आगामी संसदीय निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंका अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

श्रीलंकेतील आगामी संसदीय निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंका अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, सिरीसेना यांच्या सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रपती सुरक्षा विभागाऐवजी सुरक्षा व्यवस्था कमांडो पथकाकडे सोपविण्यात आली आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत राष्ट्रपती सुरक्षा विभागावर सिरीसेना यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सिरीसेना यांच्या सुरक्षेची जबाबदारी उच्चप्रशिक्षित कमांडो पथकावर सोपविण्यात आली आहे. श्रीलंकेत १७ ऑगस्ट रोजी संसदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पाश्र्वभूमीवर हा बदल करण्यात आला. तामीळ वाघांविरोधातील संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच सिरीसेना यांनी संरक्षणमंत्रिपद भूषविल्याने एलटीटीईकडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Srisena security change