Video : “भाजपा मुक्त भारत लवकरच घडवू”; ममता बॅनर्जींसोबत संवाद साधल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढाने केलेलं वक्तव्य चर्चेत

मुंबई दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सिव्हिल सोसायटीमधील सदस्यांशी संवाद साधला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते.

swara bhaskar richa chaddha on mamata banerjee
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्डाने ममता बॅनर्जींशी संवाद साधताना केलेल्या या वक्तव्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. ३० नोव्हेंबर रोजी त्या मुंबईत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी सिव्हिल सोसायटीमधील सदस्यांशी संवाद साधला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतील जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, रिचा चड्डा यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्डा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Statement of bollywood actresses swara bhaskar and richa chaddhas during civil society program with mamata banerje kak

ताज्या बातम्या