चार्ल्स शोभराजची १९ वर्षांनी नेपाळच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. या सुटकेनंतर त्याने इंडियन एक्स्प्रेसच्या News and Investigation या विभागाच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर रितू सरिन यांच्याशी संवाद साधला. आपल्याला अजून अनेक वर्षे जगायची इच्छा आहे. नेपाळमधून सुटका झाल्यावर मी थेट माझ्या घरी फ्रान्सला जाणार आहे असंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. एवढंच नाही तर आपल्या मुलाखतीत त्याने कंदहारच्या विमान ओलीस ठेवलं गेल्याच्या प्रसंगाचा उल्लेख केला. भारतातल्या प्रवाशांचा जीव धोक्यात होता त्यावेळी आपण मसुद अझहरच्या पक्षातील लोकांशी चर्चा केल्याचंही त्याने सांगितलं.

काय म्हणाला आहे चार्ल्स शोभराज मुलाखतीत?
आपल्या मुलाखतीत चार्ल्स शोभराजने २००३ मध्ये कसा पकडला गेलो ते सांगितलं आहे. तसंच दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये १९७६ आणि १९९७ अशा वर्षांमध्येही तो होता. त्याचेही अनुभव त्याने सांगितले आहेत. तसंच कंदहार या ठिकाणी जेव्हा भारतातलं विमान हायजॅक करण्यात आलं होतं तेव्हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरशी कसं बोललो आहे हे देखील त्याने मुलाखतीत सांगितलं. मसूद अझहरशी अनेकदा बोललो आहे.

चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा अटक करणारा ‘मराठमोळा’ अधिकारी! बेड्या नसताना ‘ही’ युक्ती लढवून केलं जेरबंद

कंदहारच्या घटनेबात काय म्हणाला आहे चार्ल्स शोभराज?
१९९९ मध्ये भारताचं विमान अपहरण करण्यात आलं. त्यावेळी अनेक प्रवाशांना ओलीस ठेवलं गेलं होतं त्यावेळी मसूद अझहरची सुटका झाली. त्यावेळी जसवंत सिंह हे माझ्या संपर्कात होते. सगळ्यात आधी त्यांनीच मला पॅरीसला भेटण्यासाठी एक माणूस पाठवला.

त्या व्यक्तीशी भेट झाल्यानंतर मी जसवंत सिंह यांच्याशीही बोललो. मी हरकत उल अन्सार या मसूदच्या पक्षातल्या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना सोडण्यास नकार दिला. मात्र पुढचे ११ दिवस एकाही ओलीस प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा आम्ही करणार नाही असं आश्वासन मी त्यांच्याकडून मिळवलं असंही चार्ल्स शोभराजने मुलाखती सांगितलं.

फोटो सौजन्य-ट्विटर

भारताकडे वाटाघाटी करण्यासाठी ११ दिवस होते. मात्र त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीत भारताला मसूद अझहरला सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी मला जसवंत सिंह यांचा फोन आला. त्यांनी मला मसूदशी बोलायला सांगितलं अपहरण केलेल्या प्रवाशांना सोडण्यासाठी मी मसूदचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी मी बोलण्यास नकार दिला आणि जसवंत सिंह यांना सांगितलं की मसूदशी मी अनेकदा बोललो आहे. तो ही अट कधीही मान्य करणार नाही. उलट ११ दिवसांनी लोकांना मारण्यास सुरूवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोभराजने केलं रणदीप हुडाचं कौतुक
चार्ल्स शोभराजची शुक्रवारी सुटका करण्यात आली. तो फ्रान्सला परतला आहे. आपल्या कुटुंबासमवेत आपल्याला आणखी बरीच वर्षे जगायचं आहे अशी इच्छाही त्याने बोलून दाखवली. एवढंच नाही तर त्याने रणदीप हुडाचं कौतुकही केलं. मै और चार्ल्स नावाच्या सिनेमात रणदीप हुडाने खूप चांगला अभिनय केला आहे. मी त्याला गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात भेटलो होतो. बॉलिवूडच्या टॉप कलाकारांमध्ये रणदीप हुडाचं नाव एक दिवस गणलं जाईल असं मला वाटतं असंही शोभराज म्हणाला.