ट्रेनने अनेकजण प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास हा सोपा आणि स्वत असतो. ट्रेनमधून प्रवास करताना आपण अनेक रेल्वे स्थानकांवरून जातो. पण भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन याबाबत कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? ज्या स्टेशननंतर भारताची सीमा संपते आणि इतर देशाची सीमा सुरू होते. त्या स्टेशन बद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर आज आम्ही तुम्हाला भारतातील शेवटच्या स्टेशन असलेल्या रेल्वेस्टेशनबद्दल सांगणार आहोत. तसंच हे स्टेशन आजही तसे आहे जसे इंग्रज सोडून गेले होते. या स्टेशनचे नाव सिंहाबाद आहे. जो बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. भारतातील या शेवटच्या स्टेशनबद्दल जाणून घेऊया.

ओसाड पडले आहे हे रेल्वे स्टेशन..

सिंहाबाद रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. असे म्हटले जाते की एकेकाळी या स्थानकाने कोलकाता आणि ढाका दरम्यान संपर्क प्रस्थापित केला होता. या ठिकाणाहून अनेक प्रवासी गाड्या जात असत. मात्र आजच्या काळात हे स्थानक पूर्णपणे ओसाड पडले आहे. येथे एकही प्रवासी गाडी थांबत नाही, त्यामुळे प्रवाशांची ये-जा होत नाही. या रेल्वे स्थानकाचा उपयोग माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो.

सिंहाबाद रेल्वे स्थानक आजही ब्रिटीशकालीन आहे. कार्डबोर्डची तिकिटे आजही इथे मिळतील, जी आता कोणत्याही रेल्वे स्टेशनवर दिसत नाहीत. याशिवाय सिग्नल, दळणवळण आणि स्टेशनशी संबंधित सर्व उपकरणे, टेलिफोन आणि तिकिटे आजही ब्रिटिशकालीन आहेत. अगदी सिग्नलसाठी देखील हँड गिअर्सचा वापर केला जातो. स्थानकाच्या नावाने छोटे कार्यालय बांधण्यात आले असून त्यात एक-दोन रेल्वे क्वार्टर असून कर्मचारी केवळ नावालाच आहेत.

( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील असे एकमेव स्टेशन ज्याचे नाव वाचताना तुमचीही जीभ अडखळेल; हवं तर ट्राय करा)

स्टेशनच्या नावासोबत लिहिले आहे ‘भारताचे शेवटचे स्टेशन’

सिंहाबाद स्टेशनचे नाव बोर्डवर ‘भारताचे शेवटचे स्टेशन’ असे लिहिले आहे. एकेकाळी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या लोकांनी ढाका जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला होता, असे म्हटले जाते. पण आज फक्त मालगाड्याच वाहतूक करतात. असे म्हटले जाते की १९७१ नंतर, जेव्हा बांग्लादेशची निर्मिती झाली, तेव्हापासून भारत आणि बांगलादेश दरम्यान प्रवासाची मागणी वाढू लागली. १९७८ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या करारानुसार भारतातून बांगलादेशात मालगाड्या धावू लागल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही लोक ट्रेन थांबण्याची वाट पाहत आहेत…

२०११ मध्ये या करारात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आणि त्यात नेपाळचा समावेश करण्यात आला. आज बांग्लादेश व्यतिरिक्त नेपाळला जाणाऱ्या मालगाड्याही या स्थानकावरून जातात आणि अनेकवेळा थांबल्यानंतर सिग्नलची वाट पाहत असतात. मात्र येथे एकही प्रवासी गाडी थांबत नाही. तरीही येथील लोक या स्थानकावर पॅसेंजर ट्रेन कधी थांबणार याची प्रतीक्षा करत आहेत.