What are VVPAT and Importance of VVPAT : निवडणुकीदरम्यान VVPAT हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल किंवा वाचला असेल पण तुम्हाला माहिती आहे का VVPAT म्हणजे नेमकं काय आहे आणि हे मशीन कसे काम करते? निवडणुक प्रक्रियेत VVPAT मशीनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज आपण याच VVPAT विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

VVPAT म्हणजे नेमकं काय? (what are VVPAT?)

VVPAT म्हणजे व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (Voter Verifiable Paper Audit Trail). मतांची पडताळणी करणे, हे या मशीनचे मुख्य काम आहे. हे मशीन थेट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) शी जोडलेली आहे. VVPAT मशीन ही मतदारांना दिसणारी एक कागदी स्लिप तयार करते, जी मतदारांचे मत इव्हीएमवर अचूकपणे नोंदवण्यात आले की नाही, याची पडताळणी करते. या स्लिपमध्ये मतदाराने कोणत्या पक्षाला आणि चिन्हाला मत दिले, याविषयी माहिती असते. (what are VVPAT or Voter Verifiable Paper Audit Trail what is the importance of VVPAT in election process)

Tips for Buying a New Car in marathi
नवीन कार घरी आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तपासणी करणे गरजेचे? PDI टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या A TO Z माहिती
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
mpsc mantra loksatta
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा – प्राकृतिक भूगोल
Paris Paralympics 2024 | what is the meaning of The Agitos Logo
Paralympics 2024 : पॅरालिम्पिक लोगोचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या, काळानुसार लोगो कसा बदलला?
Criticism of the government is Naxalism
सरकारवर टीका म्हणजे नक्षलवाद नव्हे!
Rape on Minor Girl
Crime News : “मावशी, बलात्कार म्हणजे काय?”, अल्पवयीन पीडितेने सामूहिक बलात्काराच्या दोन दिवस आधी विचारला होता प्रश्न
constitution
संविधानभान: धन विधेयकाची वैशिष्ट्ये

हेही वाचा : Deepfake: गूगल सर्चमधून डीपफेक व्हिडीओ, फोटो काढून टाकण्यासाठी काय करावं? ‘या’ सात स्टेप्स करा फॉलो; झटक्यात दूर होईल चिंता

याशिवाय मशीनमध्ये एक पारदर्शक बॉक्स असतो, ज्याद्वारे मतदार या स्लिपचे नीट निरीक्षण करू शकतो. शेवटी ही स्लिप मशीनच्या सीलबंद डब्यात सुरक्षितपणे जमा होते.

धिक पारदर्शकता आणण्यासाठी कोणते उपाय राबवले जाऊ शकतात, याची चर्चा करण्यासाठी २०१० मध्ये निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. त्यामध्ये VVPAT ची संकल्पना मांडण्यात आली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ही मशीन सुरू करण्यात आली. तेव्हा याचा वापर मर्यादित राज्यात करण्यात आला होता पण जून २०१७ पर्यंत VVPAT चा १०० टक्के वापर करण्यात आला.

हेही वाचा : वाढदिवसाला तुम्ही आनंदी असता की दुःखी? ‘या’ दोन्ही गोष्टींचा ‘Birthday Blues’शी काय संबंध ? ‘बर्थडे ब्लूज’ म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या…

VVPAT निवडणुकीदरम्यान का चर्चेत असते?

विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. विरोधकांच्या मते, EVM मतांबरोबरच VVPAT स्लिप्सचीही १०० टक्के मोजणी व्हायला हवी. ही स्लिप थेट खालील बॉक्समध्ये न पडता मतदारांच्या हातात आली पाहिजे. मतदाराने आपल्या मताची पडताळणी केल्यानंतर ती स्लिप एका बॉक्समध्ये जमा केली पाहिजे, जेणेकरून पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पडेल.