देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. होळी असली तरी निवडणुकांमुळे होळीनिमित्त संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.पोलिसांना कोणतेही सण असले तरी कर्तव्य प्रथम बजवावे लागते. मात्र तुम्हाला माहितीये का, ऑन ड्युटीवर असलेल्या पोलिसांना होळी साजरी करता येते का? अनेकदा वर्दीवर डान्स केल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला आहे. जाणून घ्या पोलिसांबाबत काय नियम आहेत.

पोलीस

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
thane theft news, jewellery theft thane marathi news
सुट्टी घेतल्यामुळे सेल्समनची चोरी उघड, १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; नौपाडा पोलिसांनी केली सेल्समनला अटक

भारतीय पोलिसांची ओळख म्हणजे खाकी वर्दी. होळीच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय जाणूनबुजून रंग टाकला तर पोलीस त्याच्यावर कारवाई करू शकतात. मात्र, ड्युटीवर असताना एखाद्या व्यक्तीने संमतीने पोलिस कर्मचाऱ्याला रंग लावल्यास त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही पोलिसाच्या गणवेशावर रंग किंवा इतर कोणतीही शाई लावणे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी त्या राज्यातील पोलीस कायदेशीर कारवाई करू शकतात.

पोलिस गणवेशाचे नियम

भारतात पोलिसांच्या गणवेशाबाबत राज्यघटनेत कायदा आहे. यानुसार कोणतेही राज्य आपल्या पोलिसांच्या गणवेशावर आणि त्यांच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर निर्णय घेऊ शकते. संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या यादी २ मध्ये त्याचा उल्लेख आहे. या अंतर्गत राज्य सरकार त्यांच्या पोलीस आणि सुरक्षा दलांच्या गणवेशावर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांचा गणवेश वेगवेगळा दिसतो.

हेही वाचा >> आज धूलिवंदन आहे की रंगपंचमी? दोघांमधील फरक व धुळवड कशी साजरी केली जाते, जाणून घ्या

पोलीस होळी खेळतात

पोलीस होळी खेळत नाहीत असे नाही. पोलीसांच्या निवासस्थानी किंवा इतर ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय साध्या ड्रेसमध्ये होळी खेळतात. याशिवाय विविध पोलीस स्टेशन आणि पोलीस विभाग कार्यालयातील पोलीस कर्मचारीही एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. परंतु कोणत्याही सामान्य व्यक्तीला कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला परवानगीशिवाय रंग किंवा शाई लावता येत नाही. तसे केल्यास पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात. प्रत्येक राज्यात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या गणवेशाबद्दल वेगवेगळे नियम आहेत.