scorecardresearch

Premium

कार सुरू करताच AC चालू करायचा की ठराविक वेळेनंतर? कारच्या दृष्टीने योग्य पद्धत कोणती जाणून घ्या

अनेक लोक ज्याप्रमाणे घरात एसीचा वापर करतात, तसाच कारमध्येही करतात.

Car AC Facts
कारमध्ये AC सुरु करण्याची योग्य वेळ कोणती? (Photo : Freepik)

सध्या देशभरात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे सकाळी १० च्या नंतर घरातून बाहेर पडायलाच नको वाटतं. रस्त्याने चालतानाही उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. अशातच जर लांबचा प्रवास करायचा असेल तर एसीशिवाय प्रवास करणं खूप त्रासदायक ठरु शकतं. त्यामुळे अनेकजण ज्या वाहनांमध्ये एसीची सोय आहे, त्यातूनच प्रवास करणं पसंत करतात.

लोक ज्याप्रमाणे घरात वेगवेगळ्या पद्धतीने एसीचा वापर करतात, तसाच ते कारमधील एसीचाही वापर करतात. ज्या लोकांना उष्णतेचा जास्त त्रास होतो, ते आधी कार सुरू करतात, त्यानंतर एसी सुरू करतात आणि काही वेळाने कारमधील वातावरण थंड झाल्यानंतर ते कारमध्ये बसतात. तर काहीजण कार सुरू करताच एसी चालू करतात. मात्र काहीजण असे आहेत जे गाडी सुरू केल्यानंतर काही वेळ एसीशिवाय गाडी चालवतात आणि नंतर AC ऑन करतात. पण या सर्वांपैकी एसी चालू करण्याची योग्य पद्धत कोणती? हा प्रश्न अनेकांना पडतो. मेंन्टनन्स आणि मायलेजच्या दृष्टीने कारची देखभाल करण्यासाठी नेमकी योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठीच कारमध्ये एसी कधी चालू करायचा? आणि कारमधील एसी चालू करण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

हेही वाचा- पेट्रोल पंपवर जाऊन गाडीमध्ये इंधन भरताना ‘या’ चुका करणे टाळा, नाहीतर होईल..

कारमध्ये एसी सुरु करण्याच नियम –

जेव्हा तुम्हाला कारमध्ये एसी चालू करायचा असेल तेव्हा सर्वात आधी इंजिन सुरू करा आणि नंतर एसी. शिवाय कारच्या इंजिनला व्यवस्थित गरम होऊ द्या. त्याचप्रमाणे कार बंद करताना थेट इंजिन बंद करू नका, कार बंद करण्यापूर्वी आधी एसी बंद करा आणि त्यानंतर इंजिन बंद करा. तसेच जर तुमची कार खूप वेळ उन्हात उभी असेल तर गाडीत बसल्यावर लगेच एसी चालू करू नका. अशा परिस्थितीत आधी कारचे दरवाचे आणि खिडक्या काही वेळ उघड्या ठेवा आणि नंतर एसी चालू करा.

हेही वाचा- मुंबई, पुणे सारख्या महानगरात ट्रॅफिक जाममध्ये न अडकण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या Key Tips; जाणून घ्या सविस्तर

सर्वात महत्वाची बाब लक्षात ठेवा, ती म्हणजे सुरुवातीला कधीही एसी सर्वात जास्त स्केलवर ठेवू नका. एसीचे तापमान किंवा स्पीड हळूहळू वाढवा. कारण जास्त वेगाने एसी चालवणे हे कारचे इंजिन आणि मायलेज दोन्हीसाठी चांगले नाही. तसेच तुमच्या कारमध्ये एसी असेल तर अनेकदा एसी चालू ठेवूनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. यासोबतच गाडीच्या एसीमध्ये गॅस टाकताना गाडीच्या इंजिनच्या ऑइलचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

गाडीचा एसी चालवताना गाडीत दुर्गंधी येत असेल तर ती बाष्पीभवनात जमा झालेल्या बुरशी किंवा बॅक्टेरियामुळे येऊ शकते, त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या. याशिवाय, जर कधी कारमध्ये एसी काम करत नसेल तर मेकॅनिकला दाखवण्यापूर्वी एसीचा फ्यूज तपासा, कारण अनेक वेळा एसी बंद पडण्याला फ्यूज कारणीभूत असते. तसेच एसीमध्ये बाष्पीभवन, फिल्टरमुळे जास्त काही अडचणी येतात, त्यामुळे मेकॅनिककडे जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the best time to turn on ac in car while driving know simple tips fyi news jap

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×