scorecardresearch

पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते रेल्वे स्टेशनचे नाव? जाणून घ्या यामागचे कारण

रेल्वे स्टेशनचे नाव लिहलेला बोर्ड पिवळ्या रंगाचाच का असतो जाणून घ्या

पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते रेल्वे स्टेशनचे नाव? जाणून घ्या यामागचे कारण
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करतो. या प्रवासादरम्यान रेल्वे यंत्रणेबाबत अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात. असाच एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तो म्हणजे प्रत्येक रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहलेले असते? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. काय आहे ते कारण जाणून घ्या.

रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते?

पिवळा रंग हा लांबूनही दिसतो, त्यामुळे पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिलेले रेल्वे स्टेशनचे नाव लोको पायलटला लांबुनच दिसते आणि त्यानुसार ते ट्रेनची स्पीड कमी करतात. पिवळ्या रंगामुळे लोको पायलटना अंतराचा अंदाज येउन त्यांना रेल्वेचा वेग कमी करण्यास मदत मिळते. तसेच रात्रीच्या वेळीदेखील अंधारातही पिवळा रंग स्पष्ट दिसतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिले जाते.

आणखी वाचा: सिलेंडरवर असणाऱ्या अंकांचा अर्थ काय? त्याची Expiry Date असते का? जाणून घ्या

पिवळा रंग सहज का दिसतो?
लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेन्थ सर्वात जास्त असते. पिवळ्या रंगाचे लॅटरल पेरीफेरल व्हिजन लाल रंगाच्या तुलनेत साधारण १.२४ पट जास्त असतो. याचाच अर्थ इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग लांबून सहज पाहता येतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे नाव लिहण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 19:33 IST

संबंधित बातम्या