अजित पवारांनी जुलै २०२३ मध्ये सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळ हे दोन्हीही अजित पवारांना आमदारांच्या संख्याबळावर देण्यात आलं. त्यानंतर लोकसभेची निवडणूक नुकतीच बारामतीत पार पडली आहे. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ का सोडली? हे कारण सभांमधून सांगितलं आहेच. तसंच आता देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“शरद पवार हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही. दिवसरात्र सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हाती असायची. मी राजकारणात आल्यापासून १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. मी कधीही कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हतं. १९९२ ते २०१७ या कालावधीत ताब्यात ठेवलं.” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

हे पण वाचा- अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”

बारामती कशी बदलली बघा

“बारामती कशा पद्धतीने बदलली एकदा येऊन बघा. अनेक लोक सांगतात आम्हाला निवडून द्या आम्ही मतदारसंघ बारामतीसारखा करु. याचा अर्थ आम्ही काम केलं आहे. काही लोक कालच्या सभेत बरळले की हा गोरगंड्या कारखाना मी बंद केला. ज्यांना काम करता आलं नाही त्यांची पावती माझ्या नावावर का फाडता? असंही अजित पवार म्हणाले. त्यांच्याकडे आता मुद्दा नाही म्हणून काहीही बोलायचं आणि सांगायचं कारखाना मी बंद पाडला आणि लोकांची दिशाभूल करायची. असंही अजित पवार म्हणाले. भावनिक होऊन मतदान करु नका. मी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोरचं बटण दाबा कारण आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे हे विसरु नका असंही अजित पवार म्हणाले. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. पण त्यांना बाहेर पडावं लागलं कारण त्यांना लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही. आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. सुप्रिया सुळेंनाच ते पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.