scorecardresearch

Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेस ‘मॅजिक फिगर’ गाठण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ रोखण्यासाठी आमदारांना शिमला किंवा चंदिगडमध्ये बोलवणार

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.

NARENDRA MODI AND RAHUL GANDHI
नरेंद्र मोदी, राहुल गांध (फोटो-ग्राफिक्स टीम)

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. गुजरात राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताबदल झाला असून येथे काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासासून ते मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्यापर्यंतच्या कामाला काँग्रेसने सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी दिली आहे.

हेही वाचा >> Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा ९ जागांवर विजय, ३० जागांवर आघाडी

“काँग्रेसचे नेते भुपिंदरसिंग हुड्डा सध्या चंदिगडमध्ये आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि मी चंदिगडला जाणार आहोत. त्यानंतर निवडून आलेल्या आमदारांना शिमला येथे बोलवावे की त्यांना चंदिगडला घेऊन जावे, हे संध्याकाळपर्यंत ठरवले जाईल,” अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.

हेही वाचा >> Gujarat Election Results 2022 Live: गुजरातमधील विजयानंतर अमित शाह यांचं ट्वीट, म्हणाले “इतिहास घडला आहे, सर्व विक्रम…”; वाचा प्रत्येक अपडेट

त्यांनी काँग्रेस भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला घाबरत नसल्याचेही राजीव शुक्ला यांनी सांगितले. “हिमाचल प्रदेशमध्ये सध्या आम्ही ४० जागांवर आघाडीवर आहोत. निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला घाबरणार नाही. आमची हीच आघाडी कायम राहिली तर घोडेबाजार टळेल. फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रश्नच उपस्थित राहणार नाही,” असेही राजीव शुक्ला यांनी सांगितले.

हेही वाचा >> गुजरात राज्यात ‘आप’चा प्रवेश, राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येणार? मनिष सिसोदिया म्हणाले “संपूर्ण देशाला…”

दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील एकूण ६८ जागांपैकी काँग्रेस एकूण ३० जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपा सध्या १७ जागांवर आघाडीवर असून भाजपानेही आतापर्यंत ९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे येथे काँग्रेसची सत्ता येणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 14:57 IST